Gambling Raid Pudhari
नांदेड

Umarkhed Gambling Raid | जुगार अड्ड्यावर छापा; १८.५९ लाखांचा मुद्देमाल जप्त, १४ जण ताब्यात

ढाणकी–गांजेगाव रस्त्यावरील शेतातील शेडमध्ये जुगार अड्ड्यावर कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Umarkhed Police Gambling Den Busted

उमरखेड : ढाणकी–गांजेगाव रस्त्यावरील एका शेतातील शेडमध्ये सुरू असलेल्या हाय प्रोफाईल व हायटेक जुगार अड्ड्यावर उमरखेडच्या पोलीस उपविभागीय कार्यालयाच्या पथकाने सोमवारी (दि, १९) सायंकाळी छापा टाकला. अप्पर पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी गौरव कायंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कारवाईत शेतमालक, जुगार अड्डा चालकासह १४ जणांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी रोख जवळपास सव्वा दोन लाख रुपये रोख रक्कम, दुचाकी आणि मोबाईलसह एकूण १८ लाख ५९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ढाणकी–गांजेगाव रस्त्यावरील शेतातील शेडमध्ये जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती वरिष्ठ पोलीस कार्यालयाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने नियोजनबद्धरीत्या छापा टाकला. जुगार खेळण्यात गुंग असलेल्या व्यक्तींना पथकाने घेरून ताब्यात घेतले. या कारवाईमुळे ढाणकी परिसरात खळबळ उडाली आहे. यवतमाळ सह नांदेड जिल्ह्यातील ही जुगार या अड्ड्यावर आढळून आल्याने अंतर जिल्हा जुगार अड्डा येथे सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे या कारवाईत

२२ दुचाकी, १६ मोबाईल जप्त

पोलिसांनी केलेल्या कारवाईत २ लाख २७ हजार रुपये रोख, अंदाजे १३ लाख ९५ हजार रुपये किमतीच्या २२ दुचाकी आणि २ लाख २४ हजार ५०० रुपये किमतीचे १६ मोबाईल जप्त केले. याशिवाय दोन कुलर आणि पत्त्यांची ३० पाकिटे असा सुमारे १३ हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत १८ लाख ५९ हजार ५०० रुपये आहे.

या कारवाईत स्थानिक पोलिसांना पूर्वकल्पना न देता वरिष्ठ कार्यालयाच्या पथकाने छापा टाकल्याने, या अड्ड्याला स्थानिक पोलीसांचे अप्रत्यक्ष संरक्षण असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे परिसरातील अवैध जुगार व्यवसायावर नियंत्रण ठेवण्याच्या यंत्रणेच्या कार्यपद्धतीबाबत चर्चा सुरू झाली आहे. तथापि, स्थानिक पोलिसांना जुगार अड्ड्याची माहिती होती किंवा नव्हती, याबाबत अधिकृत माहीती नाही.

ही कार्यवाही पोलीस अधीक्षक कुमार चिंता आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पथकात पोलीस उपनिरीक्षक गणेश मुंढे यांच्यासह पोलीस कर्मचारी सहभागी होते. ताब्यात घेतलेल्या व्यक्तींविरुद्ध करण्यात आलेल्या पुढील कायदेशीर काय होते? या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT