कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया women's leadership in family planning File Photo
नांदेड

Family Planning : 'हम दो हमारे दो'चा सर्व भार महिलांच्या खांद्यावर

कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेत महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात

पुढारी वृत्तसेवा

Women's participation in family planning surgery is high

विठ्ठल फुलारी

भोकरः संतती प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी जेवढी महिलांची जबाबदारी असते तेवढीच जबाबदारी पुरूषाची ही असते. परंतु, याकडे पुरुष मंडळी जाणूनबुजून कानाडोळा करत असल्याचे चित्र भोकर तालुक्यात दिसून येत आहे. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया मध्ये महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असला तरी आता पर्यंत तालुक्यातील केवळ दोन पुरूषाने नसबंदी केली आहे. आमची नसबंदी नकोच, अशी भूमिका पुरूषांनी घेतली असल्याने 'हमारे दो' चा सर्व भार महिलांवर पडला आहे.

लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी आरोग्य विभागाकडून राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम, जननी सुरक्षा योजना, माता बाल संगोपन असे विविध कार्यक्रम राबविले जातात. यासाठी आरोग्य विभाग कडून जनजागृती ही केली जाते. यामुळे मागील काही वर्षांपासून 'हम दो हमारे दो' चा कार्यक्रम सुरू आहे. पण हमारे दो साठी जेवढी महिलांची जबाबदारी असते तेवढीच जबाबदारी पुरूषाची ही असते.

परंतु, या बाबीकडे पुरुष मंडळीने जाणूनबुजून कानाडोळा करत आहे. मागील एका वर्षातील या बाबतची आकडेवारी पाहिली प्राथमिक आरोग्य केंद्रातून ९० महिलांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेतली आहे.

तर भोकर ग्रामीण रुग्णालयात ३७५ महिलांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली आहे. काही काळ मुल नको काही महिलांनी तांबी बसवा पाळणा लांबवाचा मार्ग अवलंबला आहे. 'हमारे दो' चा भार महिलांनी स्वतः वर घेतला असून भोकरमध्ये आतापर्यंत केवळ दोनच पुरूषांनी नसबंदी शस्त्रक्रिया करून घेतली आहे.

आज घडीला सगळ्याच क्षेत्रात महिला आघाडी वर असल्या तरी कुटुंब नियोजन शस्त्रक्रियामध्ये मात्र पुरूषांची मक्तेदारी दिसून येत आहे. यानंतर आरोग्य विभागाला पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया करण्याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी लागणार आहे.

पुरुष म्हणतात आमची नसबंदी नको बुवा...

आतापर्यंत भोकर ग्रामीण रुग्णालयात एका पुरुषाने आणि भोसी प्राथमिक आरोग्य केंद्रात एका पुरुषाने नसबंदी शस्त्रक्रिया करून घेतली असली तरी पुरुष मात्र नसबंदी शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी पुढे येत नाहीत. याबाबत आरोग्य विभागाकडून पुरुष नसबंदी संबंधाने जनजागृती करण्यात येत आहे. भविष्यात पुरुष नसबंदी ची संख्या खरंच वाढणार का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT