Water from Babhali dam to Telangana
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात जून महिना उलटला तरी समाधानकारक पाऊस झाला नाही. पण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार गोदावरी पात्रातून तेलंगणाच्या श्रीराम सागर (पोचम पाड) जलाशयात १०.०५ दलघमी पाणी साठा सोडण्यात आला. मंगळवारी ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
केवळ नांदेड जिल्ह्यातच नव्हे दोन राज्यात चर्चेत असलेला बाभळी बंधारा जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यात उभारण्यात आला. काँग्रेसचे तत्कालीन नेते शंकरराव चव्हाण, दिवंगत आ. बाबासाहेब गोरठेकर यांच्या पुढाकारातून व अनेकांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या या बंधार्यामुळे धर्माबाद, बिलोली तसेच परिसरातील शेतकर्यांना त्याचा फायदा होणार होता.
पण तत्कालिन आंध्रप्रदेश (आताचे तेलंगणा) राज्यात याच बंधाऱ्यावरून वाद झाला. शेवटी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. दोन्ही सरकारचे म्हणने ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने २८ फे ब्रुवारी २०१३ रोजी निकाल देताना तेलंगणाला पाणी देण्याचे आदेश दिले होते.
१ जुलै व २९ ऑक्टोबर रोजी बंधार्याचे सर्व दरवाजे उघण्याचे आदेश दिले होते. १ मार्च रोजी बंधाऱ्यातील पाणी साठ्यापैकी ०.०६ टीएमसी पाणी श्रीराम सागरात सोडावे, असे नमूद करण्यात आले होते. त्यानुसार मंगळवारी एक दरव-ाजा उघडण्यात आला.
त्यानंतर त्रिसदस्यीय उपस्थितीत १४ दरवाजे उघडून १०.०५ दलघमी पाणी श्रीरामसागरात सोडण्यात आले. यावेळी केंद्रीय जल आयोगाचे कार्यकारी अभियंता एम.एल.फ्रें कलिन, कार्यकारी अभियंता सी. आर. बनसोड, तेलंगणाचे कार्यकारी अभियंता एम. चक्रपाणी, सहा. कार्यकारी अभियंता के. रवी यांच्यासह अनेक संबंधित अधिकारी उपस्थित होते. पोलिस प्रशासन व महावितरणच्या काही अधिकार्यांची यावेळी उपस्थिती होती.