Nanded Drought : भूजल पातळी खालावल्याने पाणी संकट गडद ; बळीराजा हवालदिल file photo
नांदेड

Nanded Drought : भूजल पातळी खालावल्याने पाणी संकट गडद ; बळीराजा हवालदिल

अनेक भागांतील कूपनलिका आणि विहिरी कोरड्या

पुढारी वृत्तसेवा

Water crisis deepens as water levels drop; Farmers worried

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : कमी पाऊसमान आणि भूजलाचा अमर्याद उपसा यामुळे जिल्ह्यातील अनेक भागातील भूजलपातळी झपाट्याने खालावली असून आगामी काळात गंभीर पाणी संकट ओढवले जाणार आहे. दिवसेंदिवस पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला असतानाच, या दुष्परिणामांचा थेट फटका रब्बी हंगामातील पिकांना बसत असल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.

जिल्ह्यातील भूजल पातळीत लक्षणीय घट झाली असल्याचे सांगितले जात असून कूपनलिका आणि विहिरी कोरड्याठाक पडल्या आहेत. ग्रामीण भागात पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे. पाण्याच्या या तीव्र टंचाईचा सर्वाधिक व थेट परिणाम रबी हंगामातील पिकांवर होत आहे. हरभरा, गहू, ज्वारी आणि मका यांसारख्या रबी पिकांना फुलोरा आणि दाणे भरण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यात पाण्याची गरज असते.

मात्र, सिंचनासाठी पाणी उपलब्ध नसल्यामुळे डोळ्यांसमोरच पिके सुकत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. दरम्यान, काही शेतकऱ्यांनी खाजगी टँकर किंवा उपलब्ध पाण्याच्या मोजक्या स्रोतांचा वापर करून पिके वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु वाढता खर्च यामुळे तो उपायही निष्फळ ठरत आहे.

दरम्यान, यंदाच्या मोसमात अत्यल्प प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिणामी खरिपासह रबी हंगामातील उत्पादनात देखील मोठी घट होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांच्या कर्जाचा डोंगर वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने पावले उचलणे गरजेचे बनले आहे. पिण्याच्या पाण्याचे नियोजन करतानाच सिंचनासाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देणे आणि दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT