Nanded Crime News
उमरखेड : पुढारी वृत्तसेवा
‘गाडी हळू चालव’ असे सांगितल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना १५ नोव्हेंबर रोजी रात्री उमरखेड शहरातील डॉ. झाकीर हुसेन वॉर्डात घडली. या प्रकरणी उमरखेड पोलिसांनी शेख अतिफ शेख अकबर (वय २०, रा. रहीमनगर, उमरखेड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी उमेश गजानन शिंदे (वय २५, रा. डॉ. झाकीर हुसेन वॉर्ड, उमरखेड) याने त्याच्या ओळखीच्या शेख अतिफ याला गाडी हळू चालविण्यास सांगितले. याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. वादाचे रूपांतर शिवीगाळीत झाले.
त्यानंतर शेख अतिफ याने लोखंडी रॉडने उमेश शिंदे याच्या डोक्यावर, डाव्या डोळ्यावर व गालावर मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या हल्ल्यात उमेश शिंदे गंभीर जखमी झाला.
त्याच्यावर उपचार करण्यात आल्यानंतर २० नोव्हेंबर रोजी मध्यरात्री उमरखेड पोलिस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गंगलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.