उमरखेड विधानसभा मतदारसंघातून अखेर किसनराव वानखेडे यांना भाजपने उमेदवारी दिली.  Pudhari Photo
नांदेड

उमरखेड विधानसभा निवडणूक : अखेर किसनराव वानखेडे यांना भाजपकडून उमेदवारी

Maharashtra Assembly Polls | उमेदवारीच्या रस्सीखेचीत वानखेडे यांची बाजी

पुढारी वृत्तसेवा

उमरखेड, पुढारी वृत्तसेवाः उमरखेड अनुसुचित जाती राखीव मतदारसंघातून अखेर भाजपने किसनराव वानखेडे यांची उमेदवारी जाहीर केली. ते मंगळवारी उमेदवारी अर्ज भरतील. २००९ पासून काँग्रेसमध्ये असलेले किसनराव वानखेडे यांचे नाव २०१९ पर्यंत प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारीसाठी चर्चेत होते. परंतु, पंधरा वर्षापासून प्रयत्न करून सुद्धा काँग्रेसमध्ये उमेदवारी मिळाली नाही. अखेर त्यांनी २०१९ मध्ये भाजपमध्ये प्रवेश करून उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू ठेवला होता. शेवटपर्यंत माजी आमदार राजेंद्र नजरधने यांचे नाव चर्चेत होते. परंतु, भाजपने वानखेडे यांना उमेदवारी दिल्याने त्यांची प्रतीक्षा संपली आहे.

विद्यमान आमदार नामदेव ससाने हे यांचे नाव मागे पडल्यामुळे, येथील उमेदवारी कोणाला हा प्रश्न शेवटच्या क्षणापर्यंत चर्चेला होता. काँग्रेसने उमेदवारी नाकारलेल्या माजी आमदार विजय खडसे यांना ऐनवेळी भाजपाची उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा सोमवारी दुपारी तीन पर्यंत होती. परंतु अखेर साडेतीन वाजता वृत्तवाहिन्यांवर भाजपची तिसरी यादी झळकली. या यादीत किसनराव वानखेडे यांचे नाव जाहीर झाले. विशेष म्हणजे काँग्रेसने शनिवारीच साहेबराव कांबळे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे सोमवारी त्यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. गेल्या दीड वर्षापासून येथील उमेदवारीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणाऱ्या साहेबराव कांबळे यांना यश आल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता. त्यांच्या उमेदवारी अर्ज भरताना, त्यांनी केलेले शक्ती प्रदर्शन लक्षवेधी होते. आता प्रमुख लढत भाजपाचे किसनराव वानखेडे व काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांच्यात होईल, हे स्पष्ट झाले आहे.

एकाच रस्त्यावरील दोन गावे आली समोरासमोर!

उमरखेड - पुसद रस्त्यावर एकाच रस्त्यावर दोन परस्परविरोधी टोकावर असलेली गावे म्हणजे, एकीकडे मरसुळ तर, दुसरीकडे बेलखेड. ही दोन्ही गावे आता चर्चेत आली आहेत. या दोन्ही गावांना उमेदवार मिळाले आहेत. मरसुळ चे किसनराव वानखेडे. तर बेलखेडचे साहेबराव कांबळे हे आता प्रमुख प्रतिस्पर्धी पक्षाचे उमेदवार असणार आहेत. त्यामुळे एकाच सर्कलमधील व एकाच रस्त्यावरची विभागलेली ही दोन गावे या निवडणुकीच्या निमित्याने पुन्हा एकदा चर्चेला आली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT