दोन दुचाकींची समोरा-समोर धडक, एक ठार तीन गंभीर जखमी File photo
नांदेड

Nanded accident : दोन दुचाकींची समोरा-समोर धडक, एक ठार तीन गंभीर जखमी

शेवाळा हिप्परगा रोडवर घडला अपघात

पुढारी वृत्तसेवा

Two bikes collide head-on, one killed, three seriously injured

देगलूर, पुढारी वृत्तसेवा

दोन दुचाकी वाहनांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एका दुचाकीवरील गंजगाव ता. बिलोली येथील युवक जागीच ठार झाला, तर इतर तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना देगलूर उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे. ही घटना गुरुवारी दि. १५ रोजी दुपारी शेवाळा थडीहिप्परगा या रोडवर घडली.

या संदर्भात पोलीस सूत्रांकडून हाती आलेली माहिती अशी की, गंजगाव ता. बिलोली येथील युवक मोटरसायकलवरून देगलूर कडे येत होते. तर दुसरी मोटरसायकल देगलूरवरुन शेवाळा मार्गे बिलोलीकडे जात होती. दोन मोटरसायकलची शेवाळा- थडी हिप्परगा या रोडवर समोरासमोर धडक झाली.

या अपघातात गंजगाव ता. बिलोली येथील युवक हणमंत मारुती डुबुकवाड (वय ३१) हा जागीच ठार झाला. तर माधव सायलू वन्नलवाड (वय ३०), रा. गंजगाव, शेख शोएब अजीम (वय २२) रा. रंगलरोड देगलूर, शेख उमरपाशा (वय २४), रा.नरंगलरोड देगलुर हे तीनजण गंभीर जखमी झाले आहेत.

या जखमींवर देगलूर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले असून, या प्रकरणी देगलूर पोलिस स्‍टेशनमध्ये रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT