Nanded News : सततच्या पुराच्या पाण्याने नावघाट पुलावरील पाईपलाईन गेली वाहून  File Photo
नांदेड

Nanded News : सततच्या पुराच्या पाण्याने नावघाट पुलावरील पाईपलाईन गेली वाहून

चौफाळा तसेच किल्ला परिसर पाणीटंचाईच्या संकटात

पुढारी वृत्तसेवा

The pipeline on the Navghat bridge was washed away by the continuous flood water.

नांदेड, पुढारी वृत्तसेवा मागील तीन ते चार दिवसांपासून शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे. परिसरातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे. दरम्यान, पुराच्या पाण्यात नवघाट पुलावरून टाकलेली आसदवाण चौफाळा पाण्याच्या टाकीला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन वाहन गेली आहे. त्यामुळे किल्ला जलकुंभ व चौफाळा जलकुंभ भागातील अनेक वस्त्यांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून नदीला आलेल्या प्रचंड पुराच्या पाण्याचा प्रवाह पुलावरून धोकादायक स्वरूपात सुरू होता. नदीपात्रात प्रचंड प्रमाणात पाणी वाढल्याने पुलावरून पाणी वाहत होते. याच वेगवान प्रवाहात ही पाईपलाईन अडकून पूर्णपणे वाहून गेली. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, पुराच्या पाण्याचा वेग इतका प्रखर होता की तो अंदाजे १५ ते २० किलोमीटर प्रतितास एवढा असू शकतो. अशा तीव्र प्रवाहामुळे पाईपलाईन काही मिनिटांतच तुटून नदीत वाहून गेली.

या घटनेमुळे चौफाळा तसेच लगतच्या शहरातील नागरिकांसमोर गंभीर पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे. शहरातील महिलांना व मुलांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. सर्वच स्तरातील लोकांना या पाईपलाईनच्या वाहून जाण्याचा मोठा फटका बसला आहे. महापालिका टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मात्र, कायमस्वरूपी उपाययोजना न झाल्यास पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होऊ शकतो, अशी भीती नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. दरम्यान, सध्या पाण्याची पातळी व पाऊस विचारात घेता सदर कामास वेळ लागणार आहे. करीता दि. २७ ते ३० सप्टेंबरपर्यंत किल्ला व चौफाळा जलकुंभावरुन होणारा काही भागांचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे, असे महापालिकेच्या वतीने कळविण्यात आले आहे.

या भागातील पाणीपुरवठा चार दिवस बंद

किल्ला जलकुंभ : गवळणगल्ली, गौतमनगर, पठाण गल्ली, बडानाला न्यू लाईन तसेच सराफा, जोशी गल्ली, गाडीपुरा, नावघाट नृसिंह गल्ली, मारवाडगल्ली, आयना महाल टेकडी, न्यु फतेह बुरुड, काळा पुल, नगर गल्ली, जुनी मारवाड गल्ली, सिडी घाट, अरबगल्ली ई. तसेच रेग्युलर सप्लाय बुरुड गल्ली, कुंभार टेकडी, होळी, पाठक गल्ली, सयादान, हनुमान मंदिर दुध डेअरी ई. चौफाळ जलकुंभ : सुळटेकडी १,२, टॉपसन, हातजोडी, शाहीन दवाखाना, विनकर कॉलनी तसेच मोमीनपुरा पूर्ण... भाग गणीमपुरा संघसेननगर, पिवळी बिल्डींग शांती नगर, प्रीतीनगर, बिलालनगर, महंतवाडी, भावेश्वरनगर, मंढई मोठी सप्लाय ईत्यादी भागांना होणारा पाणी पुरवठा चार दिवस उशिराने होईल, याची नागरिकांनी नोंद घ्यावी तसेच सध्या विष्णुपुरी प्रकल्पाचे गेट उघडल्यामुळे मोठ्या प्रमाणावर गाळ वाहून येत असल्यामुळे पाणी गढूळ येण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा पिण्यासाठी वापर करताना पाणी गाळून व उकळून वापर करावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT