फुलवळ ः घरकुलांचे थकीत हप्ते देण्यासाठी दिलेली 15 डिसेंबरपर्यंतची मुदत संपल्यानंतर माहिती घेण्यासाठी ठाकरे शिवसेनेने सोमवारी गटविकास अधिकारी यांच्या दालनात प्रवेश केला. पण गटविकास अधिकारी कार्यालयात हजर नसल्याने संतप्त शिवसैनिकांनी त्यांच्या खूर्चीला बेशरमाच्या फुलांचा हार घालून संताप व्यक्त केला.
या आंदोलनावेळी पंडितराव देवकांबळे, माजी सैनिक समितीचे बालाजी चुकलवाड, दादाराव शिंदे, विश्वनाथ पवार, सुनिता वडजे, व्यंकटेश सोनटक्के, लक्ष्मण कटवाड, रोहिदास शिराढोणे, आत्माराम लाडेकर, शिवाजी पाटील कदम, अच्युत मेटकर, नारायण वरपडे, जी. एम. पवळे, व्यंकट मुरकुटे यासह अनेक शिवसैनिक व घरकुल लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या आंदोलनामुळे पंचायत समिती कार्यालयात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.