Nanded-Mumbai Express : नांदेड-मुंबईसाठी स्वतंत्र एक्सप्रेस; आज शुभारंभ File Photo
नांदेड

Nanded-Mumbai Express : नांदेड-मुंबईसाठी स्वतंत्र एक्सप्रेस; आज शुभारंभ

टनकपूर-नांदेड साप्ताहिक एक्सप्रेसही धावणार

पुढारी वृत्तसेवा

Separate express for Nanded-Mumbai; launch today

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : नांदेडहून मुंबईसाठी स्वतंत्र रेल्वे गाडी सुरू करण्याची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी अखेर दक्षिण मध्य रेल्वेने पूर्ण केली आहे. अकोला, मनमाडमार्गे ही गाडी धावणार असून सोमवारपासून नांदेडकरांना मुंबईसाठी ही स्वतंत्र रेल्वे मिळणार आहे शिवाय मुंबईसह टनकपूर-नांदेड ही नवी गाडीही मिळणार आहे.

नांदेडची रेल्वे संपर्क सुविधा अधिक बळकट करण्यासाठी ६ जुलैपासून दोन नवीन एक्सप्रेस गाड्या सुरू करण्यात येत आहेत. यामध्ये एक गाडी नांदेड-मुंबई आणि दुसरी टनकपूर-नांदेड दरम्यान धावणार आहे. या दोन्ही गाड्यांना केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडी दाखविण्यात येणार आहे.

केंद्रीय राज्यमंत्री रवनीत सिंह, केंद्रीय राज्यमंत्री जितिन प्रसाद आणि केंद्रीय राज्यमंत्री अजय टम्टा हे देखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या राज्यातील रेल्वे संपर्क अधिक मजबूत केला जात असून, जनतेच्या वाढत्या अपेक्षा पूर्ण करण्यात त्याची महत्त्वाची भूमिका आहे.

याच दिशेने हजूर साहिब नांदेड येथून दोन नवीन एक्सप्रेस गाड्या सुरू करण्यात येत आहेत. यापैकी एक गाडी राज्याच्या राजधानी क्षेत्राशी तर दुसरी देवभूमी उत्तराखंडशी थेट रेल्वे संपर्क उपलब्ध करून देणार आहे.

सकाळी ९:३० वाजता शुभारंभ

या एक्सप्रेसचा शुभारंभ कार्यक्रम नांदेड रेल्वेस्थानकावर सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता होणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे, खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, खासदार रवींद्र चव्हाण, आ. हेमंत पाटील, महापौर कविता मुळे, आ. विक्रम काळे, आ. सतीश चव्हाण, आ. अमरनाथ राजूरकर, आ. बालाजी कल्याणकर, आ. आनंद बोंढारकर आदींची यावेळी उपस्थित राहणार असल्याची माहिती जनसंपर्क विभागाने दिली.

आरामदायी प्रवासाची अपेक्षा

नांदेड-मुंबई-नांदेड एक्सप्रेस आठवड्यातून दोन दिवस अकोला व मनमाड मार्गे धावेल. या गाडीत आरक्षित तसेच अनारक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध असेल. टनकपूर-नांदेड साप्ताहिक एक्सप्रेस नांदेडहून रविवारी तर टनकपूरहून मंगळवारी धावेल. ही गाडी महाराष्ट्रातील महत्त्वाच्या स्थानकांना उत्तराखंडशी थेट रेल्वे संपर्क उपलब्ध करून देईल. सुरक्षित, आरामदायी, किफायतशीर व सोयीस्कर प्रवासाची सुविधा उपलब्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT