नांदेड : धर्माबाद येथील पोलिस निरीक्षक सदाशिव भडीकर यांच्या पथकाने बाभळी येथील गोदीवरी नदीच्या पात्रात छापा टाकून वाळूचे तस्करी करणारे दोन हायवा जप्त केले. व दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी हायवा, वाळूसह 28 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, धर्माबाद येथील पोलीस निरीक्षक सदाशिव भडीकर यांना मिळालेल्या गुप्तमाहितीच्या आधाराने पथकाने शुक्रवारी बाभळी येथे छापा टाकून वाळूची तस्करी करणारे टिजी 16 टि 1280 व एम.एच 26 सीएच 3426 क्रमांकाचे दोन हायवा जप्त केला.दहा ब्रास वाळू जप्त केला.
पोलीसांनी तब्बल 28 लाखांचा मुद्दमाल जप्त केला असून, या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक बसवंत बागनन्ना मुत्येपोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शेख मौलासाब नन्नेसाब, जयमारोती देविदास आयतोडे या दोघांविरोधात धर्माबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एस.जी. संगेवार हे करीत आहेत.