हिमायतनगर : काळ्या आईनं आम्हाला पिढ्यांन पिढ्या पोसल जन्मभर भाकर दिली ज्यामुळे आजही आमच्या लेकरांच पोट भरू शकत आणि आमच्या हक्काची भाकर जर आमच्या जमिनीवर सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्प मंजूर करून प्रकल्प राबविण्याचा खटाटोप लोकप्रतिनिधी करीत असतील तर आम्हाला नक्षलवादी व्हायला भाग पाडू नका शेतकऱ्यांच्या लेकरांच्या भाकरीचा घास हिरावून घेण्याचा प्रयत्न कराल तर याद राखा असा इशारा कामारी येथील शेतकऱ्यांच्या आयोजित महाएल्गार सभेत सरकार लोकप्रतिनिधी बाबतीत तिव्र भावना वक्त्यांनी व्यक्त केल्या असून या सभेत सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करा अशी मागणी केली आहे.
हिमायतनगर तालुक्यातील कामारी येथे सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाच्या विरोधात शेतकऱ्यांनी रविवारी महाएल्गार सभेचे आयोजन केले होते. हदगाव व उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांनी सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला मंजुरी देण्याची मागणी अधिवेशनात लक्षवेधी मांडत केली होती.त्यानंतर प्रकल्पात जाणाऱ्यां विदर्भ मराठवाड्यातील गावच्या शेतकऱ्यांनी प्रकल्पाच्या विरोधात कडाडून धरण विरोधी आंदोलन सुरू केले. रविवारी कामारी येथे धरण विरोधी महाएल्गार सभेत प्रमुख वक्त्यांची भाषणं झाली आहे. या सभेत उपस्थित शेतकऱ्यांसमोर बोलतांना म्हणाले की या सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला दोन वेळा स्थगिती देण्यात आली होती परंतु दोन्ही आमदारांच्या तारांकीत प्रश्नावरून पुन्हा या प्रकल्पाला मंजुरी मिळत आहे. या प्रकल्पांसाठी आमदारांचा अट्टाहास कशासाठी जर शेतकऱ्यांचा पुळका असेल तर बंधारे बांधून सिंचनाचा प्रश्न सोडवावा परंतु हा प्रकल्प कायमस्वरूपी रद्द झाला पाहिजे अशी मागणी या सभेत केली आहे.
झालेल्या महाएल्गार सभेच्या अध्यक्षस्थानी कोंडाबाराव शिरफुले हे होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रल्हादराव जगताप पाटील, अध्यक्ष – निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती (विदर्भ-मराठवाडा), मुबारक तवर, प्रसिद्धी प्रमुख व संघटक सचिव, निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती तथा माजी उपाध्यक्ष यवतमाळ जिल्हा परिषद, प्रल्हाद गावंडे सर, डॉ अविनाश खंदारे, डॉ. रेखाताई पाटील चव्हाण, प्रकाश पेंदे, दिनेश रावते, प्रा. संध्याताई कदम, चक्रधर पाटील देवसरकर, यांनी विराजमान होत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सभेला प्रमुख उपस्थित मान्यवरांमध्ये माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, स्वराज्य पक्षाचे माधवराव पाटील देवसरकर, कृष्णा पाटील आष्टीकर, गायक सुनील चव्हाण यांनी गीत सादर करून शेतकऱ्यांना जागे करण्यासाठी प्रयत्न केला.
या प्रकल्पात विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार असुन अनेक शेतकऱ्यांना पिढ्यांन पीढ्या भाकर देणारी आमची जमिन हिसकावून घेतल्या जात असेल तर शेतकरी गप्प बसणार नाही, प्रकल्पाची मागणी करणाऱ्या नेत्यांना गावबंदी केली जाणार असुन या आंदोलनात प्रत्येक शेतकऱ्यांच मुलगा सहभागी होणार आणि हा सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला कायमचं रद्द केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही रद्द झाले तरच आमची पिढ्यांन पीढ्याची भाकर मिळेल असे आवाहन केले आहे. या महाएल्गार सभेला विदर्भ मराठवाड्यातील हजारो महिला पुरुष आबालवृद्ध शेतकऱ्यांनी उपस्थित राहून जान देंगे लेकीन जमिन नही देंगे असा नारा या सभेत दिला आहे.