Nanded News : नांदेडच्या पालकमंत्र्यांना हटवा; सेनेच्या शहरप्रमुखांची मागणी ! file photo
नांदेड

Nanded News : नांदेडच्या पालकमंत्र्यांना हटवा; सेनेच्या शहरप्रमुखांची मागणी !

पुढारी वृत्तसेवा

Remove Nanded's Guardian Minister; demand by Sena's city chief!

विशेष प्रतिनिधी

नांदेड : पालकमंत्री अतुल सावे यांच्या कार्यशैलीवर भाजपाचे नेते, पदाधिकारी आणि जिल्ह्यातील पक्षाचेच नगरसेवक नाराज असल्याची चर्चा पक्ष संघटनेत होत असतानाच त्यांच्यावर गंभीर आरोप करत शिवसेनेचे शहरप्रमुख तुलजेश यादव यांनी या पदावरून सावे यांना हटविण्याची मागणी केली आहे.

राज्य मंत्रिमंडळातील शिवसेनेचे मंत्री संजय राठोड एका खाजगी कार्यक्रमासाठी नांदेडमध्ये आले होते. हा नियोजित कार्यक्रम पार पडल्यानंतर मंत्री राठोड काही वेळ हॉटेल सूर्या प्राइडच्या एका कक्षामध्ये थांबलेले असताना यादव यांनी त्यांची भेट घेऊन पालकमंत्री बदलण्याची मागणी करणारे निवेदन सादर केल्यानंतर सावे यांची कार्यशैली चर्चेमध्ये आली आहे. याप्रसंगी रमेश राठोड व प्रद्युमन (बॉबी) राठोड उपस्थित होते. याच कार्यक्रमास शिवसेनेचे दोन आमदारही उपस्थित होते; पण ते दोघेही दुसऱ्या कार्यक्रमासाठी निघून गेल्यानंतर मंत्री राठोड यांना निवेदन सादर केले गेले.

गेल्या १५ ऑगस्ट रोजी मुख्य ध्वजारोहण व अन्य काही कार्यक्रमांसाठी पालकमंत्री नांदेडमध्ये आले होते. दुपारच्या सत्रात नांदेड-वाघाळा मनपातील भाजपा पदाधिकारी तसेच जिल्ह्यातील काही नगराध्यक्षांना सोबत घेऊन खा. अशोक चव्हाण यांनी सावे यांची विश्रामगृहामध्ये भेट घेतली होती. या भेटीत नांदेड- वाघाळा मनपा तसेच जिल्ह्यातील काही नगर परिषदांसाठी जिल्हा नियोजन समितीकडून निधी देण्याची मागणी करण्यात आली होती;

पण सावे यांनी वरील शिष्टमंडळास अनुकूल प्रतिसाद दिला नाही, असे नंतर सांगण्यात आले होते. भाजपामध्ये त्यांच्याबद्दल नाराजी असल्याची चर्चा त्यानंतर येथे सुरू झाली, तरी आतापर्यंत तरी सावे यांच्याविरुद्ध मुख्यमंत्री किंवा प्रदेशाध्यक्षांकडे कुणी तक्रार केलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT