Reddy, Gaur awarded President's Medal for second time
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : नांदेडचे भूमिपुत्र व सध्या पुणे जिल्ह्यात उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून कार्यरत असणारे राजेंद्रसिंह प्रभूसिंह गौर व नागपूर येथे कार्यरत असणारे नवीनचंद्र रेड्डी यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदक पुरस्कार जाहीर झाला आहे.
सध्या नागपूर येथे कार्यरत असलेले विशेष पोलीस महानिरीक्षक नवीनचंद्र रेड्डी हे धर्माबाद तालुक्यातील रहिवासी आहेत. त्यांना यापूर्वी राष्ट्रपती पदक मिळाले होते. दहशतवाद विरोधी पथकात केलेली कामगिरी आजही संस्मरणीय आहे. मुंबई, अमरावती, बीड, गडचिरोली, परभणी यासह राज्याच्या वेगवेगळ्या भागात आपल्या कार्याचा ठसा उमटला होता. दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख म्हणून नांदेड जिल्ह्यातील या दोन्ही भूमीपूत्रांना दुसऱ्यांदा हा पुरस्कार मिळणे ही खूप दुर्मीळ बाब आहे.
यापूर्वी २०१८मध्ये त्यांच्या उत्कृष्ट आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठी त्यांना पहिल्यांदा राष्ट्रपती पदक सन्मान मिळाला होता. त्यानंतर आता पुन्हा २०२५मध्ये उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले असून दोन वेळेस राष्ट्रपती पदकावर आपल्या कर्तृत्वाची मोहोर उमटवणारे ते बोटावर मोजता येतील अशा अधिकाऱ्यापैकी हे दोन पोलीस अधिकारी झाले आहेत. नवीनचंद्र रेड्डी हे १९९४ मध्ये पोलीस सेवादलात रुजू झाले होते. छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांनी एका दहशतवाद्याचा एन्काऊंटर करून आपल्या सहकाऱ्याचे प्राण वाचविले होते.
अमरावती येथे कर्तृत्वाची विशेष पोलीस महानिरीक्षक असताना जातीय सलोखा अबाधित ठेवला होता. त्यांच्या आजपर्यंतच्या तीस वर्षाच्या कारकीर्दीची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. सध्या ते नागपूर येथे सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांच्या नांदेड मधील सहकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला.
नांदेड शहरातील रहिवासी असलेले अन्य एक अधिकारी राजेंद्रसिंघ गौर हे तहसीलदार म्हणून सेवानिवृत्त झालेले आणि शिस्तप्रिय म्हणून ओळख असणारे प्रभूसिंह गौर यांचे ते मोठे जीव. पदवी पूर्ण करून वयाचा २२व्या वर्षी पोलीस अधिकारी म्हणून ते खात्यात रुजू झाले. चिरंजीव. नाशिक येथील पोलीस अधिकाऱ्यांच्या देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणामध्ये त्यांचा सर्वोत्कृष्ट अधिकारी म्हणून सन्मान झाला आहे. ज्या-ज्या ठिकाणी त्यांनी सेवा दिली त्या प्रत्येक ठिकाणी त्यांच्या कार्यकाळात गुन्हेगारीचा आलेख कमी झाला.
सामाजिक, धार्मिक सलोखा त्यांनी कायम ठेवण्यात यश मिळवले. गुन्हेगारांचे कर्दनकाळ म्हणून त्यांची ओळख आहे. अनेक गंभीर गुन्हे त्यांनी काही तासात उघडकीस आणले. त्यांच्या कारकीर्दीत घडलेल्या प्रत्येक गुन्ह्याची उकल त्यांनी केली. लातूर शहरासह जिल्ह्यातील किल्लारी, वाढवणा, चाकूर, पूर्णा, आखाडा बाळापूर, हिंगोली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर येथे दहशतवाद विरोधी पथक प्रमुख म्हणून काम करताना उल्लेखनीय कार्य केले तसेच भोकरदन, कदीम गंज जालना, जालना स्थानिक गुन्हा अन्वेषन शाखा, त्यांच्या कार्यकाळात जालना येथील पोलीस स्टेशनला आयएसओ प्रमाणपत्र मिळाले.
त्यानंतर पोलीस उपअधीक्षक म्हणून अक्कलकोट, चाकण आणि सध्या सासवड येथे ते कार्यरत आहेत. या सगळ्या ठिकाणी पोलीस खात्याची मान उंचावण्याचेच काम त्यांनी केले. रनिंग, सायकलिंग या क्रीडा क्षेत्रात निपुण, उत्कृष्ट फोटोग्राफर, पर्यावरण आणि जंगल सफारी यामध्ये रमणारा हा पोलिस अधिकारी नांदेडचा भूमिपुत्र असल्याचा नांदेडकरांना अभिमान आहे. राष्ट्रपती पदक सन्मान दुसऱ्यांदा मिळाल्याबद्दल सर्वच क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदन होत आहे.