Nanded Political News : पोलिसांच्या सतर्कतेमुळे शिवसेनेच्या (उबाठा) गटातील राडा टळला File Photo
नांदेड

Nanded Political News : पोलिसांच्या सतर्कतेमुळे शिवसेनेच्या (उबाठा) गटातील राडा टळला

शिवसेनेचे माजी शहरप्रमुख गौरव कोटगिरे यांची हकालपट्टी झाल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.

पुढारी वृत्तसेवा

Police vigilance averted a clash within the Shiv Sena (Ubatha) faction

नांदेड, पुढारी वृत्तसेवा: दोन दिवसांपूर्वी हाणामारीचे प्रकरण झाल्यानंतर शिवसेनेच्या (उबाठा) गटातील माजी जिल्हाप्रमुखासह माजी शहराध्यक्ष गौरव कोटगिरे यांची हकालपट्टी झाल्यानंतर आज पुन्हा एकदा राड्याचा प्रसंग उद्भवला परंतु पोलिसांनी अत्यंत संयमाने प्रकरण हाताळल्याने मोठा अनर्थ टळला.

शिवसेनेचे माजी शहरप्रमुख गौरव कोटगिरे यांची हकालपट्टी झाल्यानंतर त्यांनी आज पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. पत्रकार परिषदेत त्यांनी संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांच्यावर गंभीर आरोप केले. शिवसेनेत पदे मिळविण्यासाठी थोरात यांनी वेगवेगळ्या पदांसाठी रेटकार्डच तयार केले होते.

दोन दिवसांपूर्वी झालेल्या घटनेत माझा कोणताही संबंध नाही, फक्त माझ्याबद्दल राग असल्यामुळे माझी पक्षातून हकालपट्टी झाली. मी पक्षाचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे मी शिवसैनिक म्हणून काम करणार आहे. मला स्थानिक नेतृत्व मंजूर नाही, असे सांगताना लोहा कंधार विधानसभा मतदारसंघात मी एकनाथ पवार यांचा प्रचार केल्याचे शल्य त्याच्या मनात आहे. पुण्यातील त्यांच्या घराच टॅक्स भरण्यासाठी सांगितले. ते पैसे मी ऑनलाईन भरल्याचा आरोप त्यांनी केला.

संपर्कप्रमुख पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर बबनराव थोरात यांनी शिवसैनिकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला. निष्ठेने काम करणा-या माजी जिल्हा प्रमुख दत्ता कोकाटे यांच्यासह अनेकांनी त्यांचा छळ केला. प्रकाश मारावार यांनी उद्धव ठाकरे एकीकडे गौरव कोटगिरे पत्रकार परिषद सुरू असल्याचे समजल्यानंतर शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तेथे जमले.

शिवाजीनगर पोलिसांना कळल्यानंतर स्वतः पोलिस निरीक्षकांसह अनेक अधिकारी विश्रामगृहावर पोहोचले. सुरुवातीला शिवसैनिकांची समजूत काढल्यानंतर त्यांनी गौरव कोटगिरे यांच्यासह त्यांच्या समर्थकांना पोलिस वाहनातून त्यांना सुरक्षित बाहेर काढले. या प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्याची तयारी दोन्ही गटाकडून करण्यात आली. परंतु सायंकाळी उशिरापर्यंत कोणत्याही गुन्ह्याची नोंद झाली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT