Gambling Raid Pudhari Photo
नांदेड

Nanded Gambling Raid : नांदेडमध्ये दोन जुगार अड्ड्यांवर छापा

नांदेड पोलिस अॅक्शन मोडवर

पुढारी वृत्तसेवा

नांदेड : शहरात बेकायदेशीर मटका जुगाराविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) मोठी कारवाई केली आहे. गोकुळनगर रोडवर कल्याण ओपन नावाचा मटका जुगार खेळणाऱ्या आणि खेळवणाऱ्या चार जणांना पोलिसांनी रंगेहात अटक केली. 21 मे रोजी दुपारी 3.30 वाजता ही कारवाई करण्यात आली.

अतुल राजू ढगे, सुमित सत्यजित जाधव, शेख जमीर आणि शेख अब्बास अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. गोकुळनगर रस्त्यावर हे आरोपी विनापरवाना मटका जुगार चालवत असताना एलसीबीच्या पथकाने तिथे छापा टाकला. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून 26,930 रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.

जमादार राजकुमार चंद्रकांत डोंगरे यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दुसऱ्या एका कारवाईत नायगाव तालुक्यातील हिप्परगा जा. येथे विनापरवाना बेकायदेशीररित्या तिर्रट नावाचा पत्त्यांचा जुगार खेळणाऱ्या 6 जणांना कुंटूर पोलिसांनी रंगेहात पकडले. हिप्परगा गावातील एका ठिकाणी जुगार सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकला.

यावेळी मधुकर आनंदा कदम (वय 48), रामदास घडलिंग कदम (वय 39), महादेव रमेश गायकवाड (वय 35), संभाजी शिवराम पवार (वय 57), नामदेव खंडू गारोळे (वय 50) आणि व्यंकटी गंगाराम कदम (वय 53, सर्व रा. हिप्परगा जा., ता. नायगाव) हे पत्ते खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडून नगदी 6,600 रुपये आणि जुगाराचे साहित्य जप्त केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT