श्रीक्षेत्र माहूर ः राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेंतर्गत माहूर तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांना 1 लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे.सदरचे अनुदान 5 लाभार्थ्यांच्या थेट खात्यात जमा करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार अभिजित जगताप यांनी दिली.
दारिद्य्ररेषेखालील नोंद असलेल्या कुटुंबातील 18 ते 59 वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेंतर्गत लाभ देण्यात येतो. त्यानुसार चंद्रकला राजू नल्लावार (रा. गोंडवडसा), मुक्ता दत्तू कानिंदे (रा. पडसा), संगीता मारोती पवार (रा. इवळेश्वर), गणपत भिमा मडावी (रा. म.पार्डी), हसीनाबी शेख मेहबूब (रा. माहूर)या 5 लाभार्थ्यांच्या खात्यात प्रत्येकी 20 रु. प्रमाणे एकूण 1 लाख रुपयांचे अनुदान जमा करण्यात आले.
लाभार्थ्यांना तातडीने अनुदान मिळवून देणे कामी तहसीलदार अभिजित जगताप यांचे मार्गदर्शनात नायबतहसीलदार अर्चना सूर्यवंशी, महसूल सहायक वैभव पांढरे व आय. टी. असिस्टंट उदय वानखेडे यांनी परिश्रम घेतले.
राष्ट्रीय कुटुंब अर्थ सहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयात आवश्यक कागदपत्रासह अर्ज करावा.अभिजित जगताप, तहसीलदार