उमरी : नरेंद्र येरावार
उमरी नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) गोरठेकर गटाने एक हाती सत्ता संपादन केली असून नगराध्यक्षासह नगरसेवक पदाच्या 20 पैकी एकूण 18 जागांवर उमेदवार विजयी झाले आहेत तर भाजपा आणि काँग्रेसला प्रत्येकी एक जागेवर समाधान मानावे लागले.
उमरी नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदी शकुंतला भगवान मुदीराज विजयी (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट) यांना 4969 मते मिळाली असून दुसऱ्या क्रमांकावर भाजपाच्या स्वप्ना श्रीराम माचेवार 3474 मते पराभूत झाल्या आहेत.
नगरसेवक पदाच्या निवडणुकीतील विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढील प्रमाणे -
प्रभाग क्रमांक 1 अ- झडते सुनंदा शेषेराव 443 विजयी, वाघमारे लक्ष्मीबाई अरविंद 273, ब चंदनवार संदीप दिलीप 464 विजयी, भुसांडे संजय कैलासराव 243, प्रभाग क्रमांक 2 अ- कंधारे रतन बाबुराव 830 विजयी, वाघमारे संतोष रामराव 294, ब कुरेशी सलमा बेगम वसीम 766 विजयी, पठाण नालिबा बेगम रईस 350, प्रभाग क्रमांक 3 अ- खांडरे अनुराधा गजानन 564 विजयी, अनंतवार अनिता श्रीनिवास 367, ब जमदाडे साईनाथ हिरामण 616 विजयी, दवणे माया बालाजी 308, प्रभाग क्रमांक 4 अ- कटकदवणे अनुसया विश्वनाथ 418 विजयी, दुधांबे भारतीबाई किशन 233, ब आरगुलवाड प्रियंका गजानन 4 11 काँग्रेस विजयी, शेख शमीम सजन (राष्ट्रवादी).
प्रभाग क्रमांक 5 अ -अलससटवार गजानन सुरेश 440 विजयी, बुंदेलकर प्रताप गंगाराम 325, ब कुलकर्णी सायली संजय 397 विजयी भाजपा, नगनूरवार जयश्री अनिल 380 (राष्ट्रवादी काँग्रेस), प्रभाग क्रमांक 6 -रणनवरे प्रीती विकेंद्र 548 विजयी, जोंधळे विजय माला प्रशांत 244, ब देशमुख कैलास श्रीनिवास 575 विजयी, देशमुख विश्वजीत विक्रम 199, प्रभाग क्रमांक 7 अ- सुमनबाई किशन रॅपनवाड 383 विजयी, दांडेवाड मीराबाई बाबू 330, ब पंडित विष्णुप्रसाद नंदकिशोर 378 विजयी, पबितवार किशोर विठ्ठलराव 294, प्रभाग क्रमांक 8- खांडरे रुक्मीनबाई शंकर 650 विजयी, पेरेवार अश्विनी सुभाष 450, ब जाधव राजेश शिवराम 624 विजयी, येताळे गणेशराव किशनराव 459, प्रभाग क्रमांक 9- सिंगरवाड निकिता कबीरराव 408 विजयी, गुंडेवाड मीनाजी मारोतराव 361, ब शिंदे लक्ष्मीबाई विठ्ठल 420 विजयी, माली पाटील चित्राबाई अशोक 345, प्रभाग क्रमांक 10- शेळके मीराबाई इरबा 613 विजयी, सवई नागमणी किरण 298, ब शेख बाबूबेग शेख हुसेन 533 विजयी, अब्दुल समाज अब्दुल लतीफ 332.
उमरी नगर परिषदेच्या निवडणुकीतील मतमोजणीला रविवारी सकाळी दहा वाजता प्रत्यक्षात सुरुवात झाली. एकूण आठ टेबलवर दोन फेऱ्यात मतमोजणी पूर्ण झाली असून मतमोजणी केंद्राच्या परिसरात मोबाईलवर बंदी टाकण्यात आली होती. कायदा आणि सुव्यवस्था टिकून ठेवण्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला. अटीतटीच्या निवडणुकीत पुन्हा एकदा गोरठेकर गट (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाने) बाजी मारली असून वीस पैकी 18 जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर काँग्रेस आणि भाजपाला प्रत्येकी एक जागेवर समाधान मानावे लागले.
या संदर्भात प्रतिक्रिया देताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिरीष देशमुख गोरठेकर आणि कैलास देशमुख गोरठेकर यांनी हा विजय आमचा नसून जनतेचा विजय आहे. कै. बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांच्या निधनानंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत उमरी शहरातील जनतेने गोरठेकर घराण्यावर विश्वास टाकून एक हाती सत्ता दिल्याचे सांगितले आहे. दरम्यान भाजपाने आपली संपूर्ण ताकद उमरी शहरात लावली होती परंतु त्यांना मात्र एका जागेवर समाधान मानावे लागले आणि काँग्रेस पक्षाला एक जागा मिळाली आहे.