प्रमोद चौधरी
नांदेड : स्वातंत्र्य दिन अवध्या चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. राष्ट्रध्वजाची अखंड निर्मिती करणाऱ्या नांदेड येथील खादी ग्रामोद्योग समितीत नेहमी प्रमाणेच कर्मचारी, कारागिरांची लगबग सुरु आहे. गंदा १ कोटी १९ लाख २५ हजार ध्वजांची निर्मिती करण्यात आली आहे. आतापर्यंत ५० लाखापर्यंतची विक्री झाली आहे. विशेष म्हणजे यंदा गुजरात, राजस्थान, हरियाणा, चंदीगड, तामिळनाडू या राज्यात सर्वाधिक राष्ट्रध्वजाची मागणी करण्यात आली आहे. देशात दोन ठिकाणीच राष्ट्रध्वजाची निर्मिती केली जाते.
यात नदिंड च कर्नाटकातील हुबळी केंद्राचा समावेश होतो. १६ राज्यांमध्ये नांदेडमधून राष्ट्रध्वज पाठविण्यात येतात, नांदेडमध्ये १९९३ पासून ध्वजनिर्मिती होते. ध्वजानिर्मितीसाठी लातूर जिल्हयातील उदगीर येथील संस्थेच्या केंद्रात तयार होणाऱ्या कोऱ्या खादी कापडाचा उपयोग केला जातो. सुरवातीला कोरा खादी कपडा अहमदाबाद (गुजरात) येथे शासन मान्यताप्राप्त बीएमसी मिलमध्ये पाठवण्यात येतो. याठिकाणी तीन रंगात स्वतंत्र ताम्याच्या स्वरूपात कपडा तयार होतो. त्यानंतर शासन निर्धारित प्रमाणकानुसार कापडाची क्षमता यंत्रावर तपासली जाते. त्यानंतरच ध्वजनिर्मितीसाठी त्या कापडाचा उपयोग होतो.
दरम्यान, स्क्रीन पेंटिंगच्या साहाय्याने ध्वाजावर अशोक चक्क उमटवण्यात येते. ध्वजासाठी वापरण्यात येणाऱ्या दोरीला घट्ट धरून ठेवण्यासाठी गरडीचा उपयोग केला जातो. ही गरडी हलदी, स्वल, साग, शिसम या लकडापासून तयार केलेली असते. दोरी मुंवईवरून मागविण्यात येते. पावसात भिजली तरी, ती खराब होत नाही. या सर्वप्रक्रियेला दोन महिने लागतात, असे समितीचे कार्यालयीन अधीक्षक ज्ञानोबा सोळुंके यांनी सांगितले.
ध्वज विक्रीतून दीड कोटीचे उत्पादन
१५ ऑगस्ट व २६ जानेवारी या दोन टप्यात ध्वज विक्री होते. गुजरात, राजस्थान, हरियाणा, चंदीगड, तामिळनाडू, येथे इतर राज्यांपेक्षा खादी ग्राम उद्योग समितीच्या राष्ट्रध्वजाला अधिक मागणी असते. दरवर्षी ध्वज विक्रीतून जवळपास दीड कोटीचे उत्पादन समितीला मिळते. मागील दोन वर्षापूर्वी हरघर तिरंगा अभियान राबविण्यात आले होते, त्यावेळी सव्वा दोन कोटींवर उत्पादन झाले होते. यंदा १ कोटी १९ लाख २५ हजार १०० रूपयांच्या ध्वजांची निर्मिती करण्यात आली. आतापर्यंत ५० रूपयांच्या ध्वजांची विक्री झाली आहे, असे मराठवाड़ा खादी ग्रामोद्योग समिती नांदेडचे सचिव ईश्वरराव भोसीकर, संचालक महाबळेश्वर मठपती यांनी सांगितले.