Nanded Zilla Parishad: Established leaders also trying to gain political benefits
संजीव कुळकर्णी
नांदेड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद इतर मागासवर्ग (ओबीसी) प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाल्यानंतर जिल्ह्याच्या राजकारणात असलेल्या काही 'विदर्भकन्यांना' हर्ष झालाच; पण आता हैदराबाद गॅझेटचा आधार मिळाल्यामुळे जिल्ह्यातील प्रस्थापित मराठा कुटुंबातील भूमिकन्यांनाही ओबीसी प्रमाणपत्र प्राप्त करण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे.
दिवंगत नेते गंगाधरराव कुंटूरकर यांच्या स्नुषा मधुमती, आ. हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री, नदिडच्या माजी महापौर जयश्री पावडे प्रभृतींची एक ओळख प्रस्थापित मराठा कुटुंबातील महिला म्हणून आहेच. त्यांचे माहेर विदर्भातील असल्यामुळे त्यांना माहेरूनच 'ओबीसी' प्रमाणपत्रांचे वाण प्राप्त झाले. पण गेल्या महिन्यातील मराठा आंदोलनामध्ये हैदराबाद गॅझेटच्या आधारे मराठवाड्यातील पात्र कुटुंबास ओबीसी प्रवर्गाचे प्रमाणपत्र देण्याचे शासनाने मान्य केल्यामुळे जिल्ह्यातील मराठा कुटुंबातील प्रमुख प्रमाणपत्रांच्या तयारीला लागले आहेत.
नायगाव मतदारसंघत्तचे आमदार राजेश पवार यांनी स्वतःचे प्रमाणपत्र पूर्वीच प्राप्त करून घेतल्यांनतर त्यांच्या एका ज्येष्ठ चुलत भगिनीचे प्रमाणपत्र काढून घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या. आ. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या चिखली गावात नोंदी सापडल्यामुळे 'गायकवाड' या मूळ आडनावावरून त्यांच्या ज्येष्ठ भगिनी आशा शिंदे तसेच राजकारणात सक्रिय असलेल्या त्यांच्या कन्या प्रणिता देवरे यांना ओबीसी प्रवर्गाचे प्रमाणपत्र काढण्यास वाव असल्याचे सांगण्यात आले.
ओबीसी प्रवर्गात येणाऱ्या वेगवेगळ्या जातींतील अनेक महिला जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय आ हेतच. मागील काळाता नांदेड जि.प.चे अध्यक्षपद बंजारा समाजातील वैशाली चव्हाण यांनी ओबीसी प्रमाणपत्राअ धारेच मिळविले होते. मराठा समाजातील काही विदर्भकन्यांनी जि.प. निवडणूक लढविली. त्यांतील मधुमती कुंटूरकर यांनी सभापतीपद भूषविले. आता स्थानिक राजकारणातील ओबीसी विदर्भकन्यांसोबत मराठा समाजाच्या भूमिकन्यांनाही ओबीसी प्रवर्गात येण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे,
नांदेड जि.प.चे अध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी राखीव झाल्यानंतर जिल्ह्यातील मराठा समाजातील कोणा नेत्यांना 'कुणबी मराठा' प्रमाणपत्र मिळविण्याचा वाव आहे, याची चर्चा सुरू झाली असून प्राथमिक चौकशी काही नावे समोर आली. जि.प.चे माजी सभापती शिवराज होटाळकर यांच्या पत्नीस लातूर जिल्ह्यातल्या माहेरहून प्रमाण पत्राचा अहेर प्राप्त झाल्याच्या माहितीस दुजोरा मिळाला.
हैदराबाद गॅझेटनुसार पात्र ठरू शकणाऱ्या व्यक्तींस 'कुणबी मराठा' प्रमाणपत्र देण्यासंदर्भात शासनाच्या नव्या निर्णयानुसार पुढील कार्यवाही पार पाडण्याची तयारी नांदेड जिल्हा प्रशासनाने केली असून गावस्तरीय समितीच्या माध्यमातून प्राथमिक प्रक्रिया सुरू केली जात आहे. १५ सप्टेंबरपासून गावस्तरीय समित्या कार्यरत होतील, जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. असे पुढील काही दिवसांत जि.प.गट आणि पंचायत समित्यांच्या गणांच्या आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईल, त्यांत कोणकोणते गट ओबीसी प्रवर्गासाठी राखीव होतात, हे स्पष्ट झाल्यावर नांदेड जि.प.च्या अध्यक्षपदाच्या स्पर्धेत कोणत्या महिला पुढे येऊ शकतात, हे जिल्ह्यासमोर येईल.https://www.youtube.com/watch?v=qBfd7a-9-88