Himayatnagar Tehsil Protest Pudhari
नांदेड

Nanded Protest | वडार समाजातील भूमिहीन कुटुंबांना पाच एकर जमीन द्या; हिमायतनगर तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा

स्थलांतर रोखण्यासाठी मनरेगातून रोजगार आणि विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची मागणी

पुढारी वृत्तसेवा

Himayatnagar Tehsil Protest

हिमायतनगर : दुष्काळी परिस्थिती, रोजगाराचा अभाव आणि पारंपरिक व्यवसायावरील संकटामुळे वडार समाजातील गरीब व भूमिहीन कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या कुटुंबांचे स्थलांतर रोखून त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, तसेच पात्र भूमिहीन कुटुंबांना प्रतिकुटुंब पाच एकर शासकीय जमीन द्यावी, या मागणीसाठी सोमवारी (दि.२६) हिमायतनगर तहसील कार्यालयावर वडार समाजाच्या वतीने जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

रोजगाराच्या शोधात अनेक कुटुंबांना परराज्यांत तसेच इतर जिल्ह्यांत स्थलांतर करावे लागत आहे. यामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर परिणाम होत असून, आर्थिक अडचणीही वाढत आहेत. या परिस्थितीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मोर्चात महिला, पुरुष आणि कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मनरेगातून रोजगार उपलब्ध करा

ऑक्टोबर २०२६ ते जून २०२७ या कालावधीत मनरेगाअंतर्गत पात्र मजुरांना नियमानुसार रोजगार द्यावा. गावपातळीवर जलसंधारण, मृदसंधारण, रस्ते आणि अन्य विकासकामे सुरू करून स्थानिकांना काम उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली. रोजगारापासून वंचित कुटुंबांचे सर्वेक्षण करून विशेष कृती आराखडा तयार करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची मागणी

स्थलांतरामुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुला-मुलींना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासकीय योजनांचा लाभ द्यावा. तालुकास्तरावर शैक्षणिक सुविधा आणि वसतिगृह उपलब्ध करून द्यावे. तसेच प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीचा अहवाल ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करावा, अशी मागणी करण्यात आली.

मोर्चादरम्यान पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT