योगेश जाधव  Pudhari
नांदेड

Nanded Drowning Incident | उमरी तालुक्यात पाणी पिण्यासाठी गेलेल्या मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू

तळेगाव शिवारातील घटनेने हळहळ

पुढारी वृत्तसेवा

Boy drowned in well Umri

उमरी: उमरी तालुक्यातील तळेगाव शिवारातील शेतातील एका विहिरीत 16 वर्षीय शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 27) सायंकाळी घडली. योगेश विठ्ठल जाधव (वय 16, रा. तळेगाव) असे मृत मुलाचे नाव आहे. या घटनेने तळेगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, योगेश हा नववीच्या वर्गात शिक्षण घेत होता. शेतातील हरभरा काढण्यासाठी तो आपल्या आई-वडिलांसोबत शेतात गेला होता. दुपारच्या वेळी तहान लागल्याने तो शेतातील विहिरीत पाणी पिण्यासाठी उतरला आणि पाय घसरून तो पाण्यात पडला. पाणी जास्त होते. त्याला पोहता येत नव्हते त्यातच तो बुडून मृत्युमुखी पडला.

या प्रकरणी उमरी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून शुक्रवारी सायंकाळी त्याच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात तळेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT