Star Air pudhari photo
नांदेड

Nanded to Goa flight service : नांदेड-गोवा विमानसेवा 31 मार्चपासून!

मराठी नववर्षामध्ये आणखी दोन विमानसेवा मिळणार

पुढारी वृत्तसेवा

विशेष प्रतिनिधी

नांदेड ः होळी-धूलिवंदनाच्या उत्सवी पर्वाच्या काळातच हवाई सेवेच्या बाबतीत नांदेडकरांसाठी आनंददायी बातमी समोर आली. नांदेड ते गोवा ही बहुप्रतीक्षित विमानसेवा येत्या 31 मार्चपासून सुरू करण्याची घोषणा झाली आहे. त्याचबरोबर नांदेड-नागपूर विमानसेवा पूर्ववत होणार असून बंगळुरूसाठी नांदेडहून आणखी एका विमानाची भर पडणार असल्याचे जाहीर होताच खा.अशोक चव्हाण यांनी नव्या विमानसेवेचे स्वागत केले आहे.

स्टार एअर कंपनीची गोवा (मोपा) नांदेड-नागपूर ही विमानसेवा मार्चअखेरीस सुरू होणार आहे. शुक्रवार वगळता आठवड्यातील सहा दिवस ही सेवा उपलब्ध राहिल. या सेवेअंतर्गत गोवा (मोपा) येथून सकाळी 9.30 वाजता उड्डाण करणारे विमान सकाळी 10.50 वाजता नांदेड येथे पोहोचेल. त्यानंतर सकाळी 11.20 वाजता नांदेडहून उड्डाण घेऊन दुपारी 12.30 वाजता ते नागपूर येथे उतरेल.

परतीच्या प्रवासात दुपारी 12.40 वाजता नागपूरहून उड्डाण घेणारे विमान दुपारी 1.30 वाजता नांदेड येथे दाखल होईल. पुढे दुपारी 2.00 वाजता नांदेडहून गोवा (मोपा)कडे उड्डाण करून दुपारी 3.20 वाजता तेथे पोहोचेल. याशिवाय फ्लाय-91 ही विमान कंपनी 29 मार्चपासून नांदेडबंगळुरू विमानसेवा सुरू करणार आहे. त्यामुळे नांदेडहून बंगळुरूसाठी एकूण दोन विमानसेवा उपलब्ध होतील.

या तिन्ही सेवा सुरू झाल्यानंतर नांदेडहून मुंबई, पुणे, नागपूर, गाझियाबाद (हिंडन), अहमदाबाद, गोवा, बंगळुरू आणि हैदराबाद या आठ प्रमुख शहरांसाठी थेट विमानसेवा उपलब्ध होणार आहे. नांदेडच्या विकासाच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार असून, उद्योग, पर्यटन, शिक्षण आणि व्यावसायिक क्षेत्राला निश्चितच याचा मोठा लाभ होईल, असे खा.अशोक चव्हाण यांनी नमूद केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT