मानसी जाधव जात असलेल्‍या याच स्‍कूटीला भरधाव वाहनाने धडक दिली. pudhari photo
नांदेड

Nanded Accident | नांदेड : भरधाव वाहनाच्‍या धडकेत २३ वर्षीय लॉच्या विद्यार्थिनीचा मृत्यू

नांदेड शहरातील घटना; वकिलीचे स्‍वप्‍न अधुरेच

पुढारी वृत्तसेवा

नांदेड : स्कुटीवरून कॉलेजला जाणाऱ्या एका विद्यार्थिनीला भरधाव कारने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात २० वर्षीय तरुण विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (१ सप्टेंबर) सकाळी १० वाजेच्या सुमारास रोड क्रमांक २६ वरील रमामाता आंबेडकर चौकात घडली. मानसी संजयकुमार जाधव (वय २०, रा. विष्णुनगर) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. या घटनेमुळे विष्णुनगर परिसर आणि शैक्षणिक वर्तुळात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, मानसी जाधव ही येथील नारायणराव चव्हाण लॉ कॉलेजमध्ये एलएलबीच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. शिक्षण घेण्यासोबतच ती एका खासगी फायनान्स कंपनीत नोकरीही करत होती. मंगळवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास मानसी नेहमीप्रमाणे घरातून स्कुटीवरून कॉलेजला जाण्यासाठी निघाली होती.

रोड क्रमांक २६ वरून जात असताना पाठीमागून आलेल्या भरधाव कारने (क्रमांक MH 26 VE 4136) तिच्या स्कुटीला जोरदार धडक दिली. कारची धडक एवढी भीषण होती की, मानसी रस्त्यावर फेकली जाऊन गंभीर जखमी झाली आणि जागीच बेशुद्ध पडली.

​अपघाताची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार गोपीनाथ फुलारी व ए. एल. वाघमारे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी मानसीला तात्काळ वजीराबाद येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात येत होते, मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वाटेत तिची प्राणज्योत मालवली. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले.

या प्रकरणी निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकाविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. मृत मानसीच्या पश्चात आई, एक बहीण, एक भाऊ, दोन काका आणि आजी-आजोबा असा परिवार आहे. तिच्या अचानक जाण्याने जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मानसीचे वकील होण्याचे स्‍वप्‍न अधुरेच

मानसी जाधव ही येथील नारायणराव चव्हाण लॉ कॉलेजमध्ये एलएलबीच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. मानसीची वकील होण्याची इच्‍छा होती. त्‍या दृष्टिने तीने शिक्षणही सुरू केले होते. मात्र नियतीच्‍या मनात काही वेगळेच होते. अचानक काळ बनून आलेल्‍या मालवाहून जीपने तीच्‍या स्‍कूटील धडक दिली. आणि यातच तीचा मृत्‍यू झाला. या आकस्‍मित मृत्‍यूने मानसीचे वकिल होण्याचे स्‍वप्‍नही अधुरेच राहिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT