नांदेड : दरोडेखोरांकडून जप्त करण्यात आलेली शस्त्रास्त्रे. pudhari photo
नांदेड

Nanded Crime : नांदेडला दरोडेखोरांची टोळी जेरबंद

घातक शस्त्रांसह पिस्तुल, काडतुसे जप्त, पाच जणांना पोलिसांनी पकडले

पुढारी वृत्तसेवा

नांदेड : जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या संकल्पनेतून राबविल्या जात असलेल्या ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत नांदेड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

कामठा बाजार ते गाडेगाव रोडवरील उड्डाणपुलाखाली दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या आहेत. त्यांच्याकडून एक गावठी पिस्तुल, जिवंत काडतूस आणि घातक शस्त्रांसह १ लाख ३२ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी २७ एप्रिलच्या रात्री ११ ते २८ एप्रिलच्या पहाटे ५ वाजेपर्यंत शहरात विशेष ऑपरेशन राबविण्याचे आदेश दिले होते. या मोहिमेदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विठ्ठल घोगरे व त्यांचे पथक गस्तीवर असताना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, कामठा बाजार ते गाडेगाव जाणारे रोडवर रेल्वे पट्टीजवळ असलेल्या उड्डाणपुलाखाली काही संशयास्पद तरुण घातक शस्त्रांसह दबा धरून बसले आहेत. या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी तातडीने त्या ठिकाणी छापा टाकला. पोलिसांचा सुगावा लागताच आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला.

पकडण्यात आलेल्या आरोपींची झडती घेतली असता, त्यांच्याकडे एक गावठी बनावटीचे पिस्तुल, एक जिवंत काडतूस, लोखंडी खंजर, लोखंडी गजाळी, दोरी, मिरची पूड आणि मोबाईल असा एकूण १,३२,१६८ रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. हे सक आरोपी दरोडा टाकण्याच्या पूर्व तयारीत असल्याचे निष्पन्न झाले असून, त्यांन पुढील कारवाईसाठी विमानतळ्ळ पोलीस ठाण्याच्या सुपुर्त करण्यात आले आहे.

ही कारवाई एलसीबीचे पोलिस निरीक्षक अतुल भोसले सहायकपोलिस निरीक्षक विठ्ठल घोगरे पोलिस अंमलदार गोविंद राठोड साहेबराव कदम, राजीव बोधगीन आणि अकबर पठाण यांच्या पथकाने केली.

हे आरोपी झाले गजाआड

योगेश ऊर्फ गोट्या चंदर सोनकांबळे (रा. हर्षनगर, नांदेड), राहुल नागनाथ काळे (रा. खोब्रागडे नगर, नांदेड) राम ज्ञानेश्वर कांबळे (रा. मुदखेड) श्रावण रामजी जोंधळे (रा. मुदखेड) मनोज साहेबराव कदम (रा. मगनपुरा नांदेड)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT