उमरखेड : हिंगोली व नांदेड जिल्ह्याला विदर्भाशी जोडणार्या उमरखेड ते करोडी रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. सदर रस्त्यावर ये जा करणाऱ्या शेतकरी बांधवांना व तसेच नागरिकांना मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.
सदर रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी, या रस्त्याचे आर.सी.सी बांधकाम करावे व रस्त्यावरील येणाऱ्या लेंडी,नाल्यावरील पुलांची उंची वाढवावी या मागणीला घेऊन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने पैनगंगा नदी पात्रात शेतकरी बांधवांसह जलसमाधी आंदोलन करण्यात आले. या रस्त्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणात असून करोडी, पेवा, येळम, काळेश्वर येथील नागरिकांना मुलांचे शिक्षणासाठी व दवाखान्यात उपचार घेण्याकरिता करोडी मार्गे उमरखेड करिता यावे लागते. परंतु रस्त्याची अवस्था अतिशय बिकट असल्याने रुग्णांना उपचार घेण्याआधीच कधीकधी जीव गमावातो. महिलांची प्रसुती रस्त्यावरच वाहनामध्ये करावी लागते. असे भयानक चित्रसुद्धा या रोडच्या खराब अवस्थेमुळे बघायला मिळाले.
पावसाळ्यातील चार महिने सदर रस्त्यावरील नागरिकांना नरकयातना भोगाव्या लागत असल्याचे दिसून येते. सदर चार महिन्यात विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान सदर रोड मुळे होते. सदर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांची शेती असून शेतीत लागवड करताना व शेतीत उत्पन्न झालेले हे आपल्या घरी किंवा बाजारपेठेत नेण्यासाठी त्यांना मोठी तारेवरची कसरत करावी लागते. शेतकरी राजांनी न्याय मागायच्या तरी कुणाकडे असा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये उद्भवत असल्याने प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्त्यांनी आक्रमक होत सदर रस्ता तात्काळ आर.सी.सी बांधकाम करून सदर रस्त्यावरील येणाऱ्या नाल्या वरील पुलांची उंची वाढवावी या मागणीला घेऊन प्रहार कार्यकर्ते मराठवाडा- विदर्भाच्या सीमेवर असणाऱ्या पैनगंगा नदी पात्रात पाण्यामध्ये जलसमाधी घेण्याच्या पवित्र घेतला . त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी खडबडून जागे झाले. सदर त्यांनी काम तात्काळ सुरू केले व सदर काम एक जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण करू असे लेखी असोसन उपविभागीय बांधकाम उपअभियंता प्रमोद दुधे यांनी दिले. त्यामुळे
आंदोलन मागे घेण्यात आले सदर आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्षाचे उमरखेड शहर प्रमुख राहुल मोहितवार, तालुका उपप्रमुख गोपाल झाडे, शहर सचिव शाम चेके, उपजिल्हा युवा प्रमुख अभिजीत गंदेवार, प्रजेश खंदारे, रघुनाथ खंदारे, सिद्धार्थ मुनेश्वर, बालाजी मुडे,डिगांबर शिंदे,विनोद कवाने,संदिप आलट,बाबुराव शिंदे,सुनील देवसरकर, प्रवीण धरणे, दीपक जाधव,भगवानराव ,शंकरराव जाधव, सुरज जाधव ,करोडी, पेवा, येळम व काळेश्वर परिसरातील सरपंच, पोलीस पाटील, शेतकरी बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उमरखेड करोडी रस्ता हा दिनांक एक जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण करून नागरिकांना सेवा देण्याचे जे सार्वजनिक बांधकाम विभागाचे इंजिनीयर दुबे यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिले आहे ते त्यांनी दिलेल्या वेळेत पूर्ण न केल्यास येणाऱ्या 26 जानेवारी रोजी बांधकाम विभागाचे पूर्ण कार्यालय ताब्यात घेऊ असा तीव्र इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर प्रमुख राहुल मोहितवार यांनी दिला.