देगलूर : देगलूर पंचायत समिती गणासाठी सोमवारी दि.१३रोजी शंकरराव चव्हाण सभागृहात निरीक्षक तथा उपजिल्हाधिकारी अनुप पाटील व तहसीलदार भरत सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत सदफा वाजीद पठाण यांच्या हस्ते चीठ्ठी काढून आरक्षण जाहीर करण्यात आले.तर सभापतीपद सर्वसाधरण महिलेकडे तर पन्नास टक्के महिला सदस्य असल्याने देगलूर पंचायत समितीवर महिला राज असणार आहे.
आरक्षण सोडत पुढील प्रमाणे जाहीर
खानापूर १२१ सर्वसाधारण, वन्नाळी १२२ अनुसूचित जाती महिला, शहापुर १२३ ना मा प्र, तमलुर १२४ अनुसूचित जाती,वळग १२५ अनुसूचित जाती महिला, करडखेड १२६ सर्वसाधारण, मरखेल १२७ अनुसूचित जमाती महिला, बेम्बरा १२८ सर्वसाधारण, हणेगाव १२९ सर्वसाधारण महिला, वझर १३० ना मा प्र या प्रकारे सोडत काढण्यात आली. देगलूर तालुका पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीची तयारी प्रशासनाच्या पातळीवर पूर्ण वेगाने सुरू झाली आहे. पंचायत समितीच्या पाच गणांचे आरक्षण सोडतीद्वारे काढण्यात आले
सदरील सोडतीनुसार देगलूर पंचायत समितीवर सभापतीपद सर्वसाधरण महिलेकडे तर पन्नास टक्के महिला सदस्य असल्याने पंचायत समितीवर महिला राज राहणार आहे.
देगलूर तालुक्यातील जि प सदस्य आरक्षण पुढील प्रमाणे....
६१-खानापूर- अनुसूचित जाती (स्त्री्)
६२-शहापूर- अनुसूचित जाती
६३-करडखेड- अनुसूचित जाती (स्त्री्)
६४-मरखेल- सर्वसाधारण (स्त्री)
६५- हाणेगाव- सर्वसाधारण