Nanded Police : नांदेड पोलिसांकडून महिनाभरात १६ कोटी २३ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त ! (File Photo)
नांदेड

Nanded Police : नांदेड पोलिसांकडून महिनाभरात १६ कोटी २३ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त !

नांदेड जिल्हा पोलिसांनी जुलै महिन्यात विशेष मोहीम राबवून गुन्हेगारांविरुद्ध आक्रमक पावले उचलली आहेत.

पुढारी वृत्तसेवा

Nanded police seize valuables worth over Rs 16.23 crore in a month!

नांदेड, पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी नांदेड जिल्हा पोलिसांनी जुलै महिन्यात विशेष मोहीम राबवून गुन्हेगारांविरुद्ध आक्रमक पावले उचलली आहेत. पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या नेतृत्वाखाली ०१ जुलै ते ३१ जुलै २०२६ दरम्यान राबवलेल्या या मोहिमेत विविध अवैध धंद्यांवर धाडी टाकून पोलिसांनी तब्बल १६ कोटी २३ लाख ४७ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या मोहिमेदरम्यान अवैध रेती उपसा व वाहतुकीवर सर्वात मोठा दणका देण्यात आला. वाळू चोरीप्रकरणी ४० गुन्हे दाखल करून ६५ आरोपींवर कारवाई करत १४ कोटी १९ लाख ३७,६६४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याशिवाय गुटखा विरोधी कारवाईत २६ गुन्ह्यांत ३४ आरोपींकडून ६०,८९,२४६ चा गुटखा जप्त, जुगार व दारूबंदी अंतर्गत जुगाराचे ८० गुन्हे दाखल करून ३२४ आरोपींकडून ४९,१०,३५०, तर दारूबंदीचे ३१७ गुन्हे नोंदवून ३३६ आरोपींकडून २६,३१,७९० चा मुद्देमाल जप्त.

अंमली पदार्थ व शस्त्रे कायदे अंतर्गत अंमली पदार्थ तस्करीत ३ गुन्ह्यांत ६ आरोपींना अटक करून २५,७१,९५० चा ऐवज जप्त केला. तसेच शस्त्र कायद्यांतर्गत कारवायांमध्ये ६ पिस्तूल, २ मॅगझीन आणि १७ घातक शस्त्रे शस्त्र बाळगणाऱ्यांवर वचक निर्माण केला तर कॉस्मेटिक विक्रीवर कारवाई करत ३९,६९,९४० चा मुद्देमाल जप्त केला, तर पीटा कायद्यान्वये २ गुन्हे नोंदवून २,३६, ३१० चा माल जप्त करत ११ पीडितांची सुटका केली. मोबाईल रिकव्हरी मोहिमेत पोलिसांनी नागरिकांचे हरवलेले तब्बल ४७१ मोबाईल शोधून ते मूळ मालकांना परत केले. अपहरण प्रकरणात कलम १३७(२) अंतर्गत २८ मुली व २ मुलांच्या अपहरण प्रकरणांत तात्काळ गुन्हे नोंदवून कायदेशीर पावले उचलण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT