नांदेड : शहरातील इतवारा भागात गस्तीवर असलेल्या पोलिसांना एकाचा संशय असल्याने चौकशी केली असता.त्याच्याकडे चोरीची दुचाकी होती शिवाय सोबत एक अल्पवयीन साथीदारही होता. अधिक चौकशी केली असता .या आरोपींनी सात दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींकडून चोरलेल्या तीन लाख रुपये किमतीच्या सात दुचाकी जप्त करत इतवारा पोलिस ठाण्यात दोघाजणां विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी रात्री इतवारा पोलिस गस्तीवर असताना पोलिसांना शेख अली शेख बाबू (वय 19) रा. मिलिंदनगर याची संशयावरून चौकशी केली असता त्याच्याजवळ एक दुचाकी चोरीची असल्याची आढळली. शेख अली सोबत एक अल्पवयीन मुलगा ही होता दोघांची चौकशी केली असता .दोघांनी अनेक ठिकाणी मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी दोघांच्या ताब्यात असलेल्या तीन लाख रुपयांच्या सात दुचाकी जप्त केल्या.या प्रकरणी पोलिस जमादार शेख समीर शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून शेख अली शेख बाबू व अल्पवयीन मुलाविरोधात इतवारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.