Nanded Gambling Raid pudhari photo
नांदेड

Nanded Gambling Raid : नांदेड जिल्ह्यात जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; २२ जणांवर गुन्हे

देगलूर उपविभाग, नांदेड ग्रामीण आणि सिंदखेड पोलिसांच्या पथकांनी तीन वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकून बेकायदेशीर जुगार अड्ड्यांचा पर्दाफाश केला.

पुढारी वृत्तसेवा

नांदेड : पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध धडक मोहीम तीव्र करण्यात आली आहे. याअंतर्गत देगलूर उपविभाग, नांदेड ग्रामीण आणि सिंदखेड पोलिसांच्या पथकांनी तीन वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकून बेकायदेशीर जुगार अड्ड्यांचा पर्दाफाश केला.

या कारवाईत एकूण २२ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, रोख रक्कम, दुचाकी आणि मोबाईल असा एकूण ७ लाख ५ हजार १४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

देगलूर उपविभागीय पोलीस अधिकारी किरण पोपळघट यांच्या पथकाने १३ सप्टेंबर रोजी बाऱ्हाळी (ता. मुखेड) येथे एका घरात सुरू असलेल्या ‘तिर्रट’ जुगारावर छापा टाकला. येथून २ लाख १० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत मुक्रामाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दुसऱ्या कारवाईत नांदेड ग्रामीण पोलिसांनी वाजेगाव विटभट्टी परिसरातील मोकळ्या जागेत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून ३ लाख २५ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

कारवाईतील आरोपींची नावे

बाऱ्हाळी (मुखेड) कारवाई :अंतेश्वर गुंगेवाड, रामदास विभुते, विनोद पवार, केशव चव्हाण, बालाजी नुरुंदे, बालाजी राठोड (ताब्यात) आणि माधव वाघमारे (फरार).

वाजेगाव (नांदेड ग्रामीण) कारवाई: शेख रमजान, सय्यद जावेद, शेख रफिक, सय्यद युसूफ, शेख गाजीत, शेख खयुम, सय्यद अब्दुल रहीम, अबुद, अन्वर मिस्त्री (ताब्यात) आणि शेख इसमाईल (फरार).

वडसा (माहूर) कारवाई: राजू दुपलवार, निखिल कोरडे, शेख तोफीक, बालाजी पावडे व श्रीकांत मुरली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT