Crime pudhari
नांदेड

Nanded crime : नांदेड परिक्षेत्रात 9 दिवसांत 66 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

मोहिमेच्या नवव्या दिवशी परिक्षेत्रात तब्बल 74 गुन्हे दाखल करण्यात आले असून, 100 जणांविरुद्ध कठोर कारवाई

पुढारी वृत्तसेवा

नांदेड ः नांदेड पोलिस परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलिस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी सुरू केलेली धडक मोहीम सुरु केली आहे. मोहिमेच्या नवव्या दिवशी परिक्षेत्रात तब्बल 74 गुन्हे दाखल करण्यात आले असून, 100 जणांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात आली आहे. या एकाच दिवसाच्या कारवाईत 66 लाख 15 हजार 853 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आली आहे.

गुटखा विक्री पडणार महागात

राज्य शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची विक्री करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कडक भूमिका घेतली आहे. नवव्या दिवशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकून 52 हजार 418 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला.

या प्रकरणातील आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 123 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कलमांतर्गत आरोपींना 10 वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद असल्याने अवैध विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलिसांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या 91 50 100 100 या खबर हेल्पलाईन क्रमांकाला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या हेल्पलाईनमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून, नागरिकांनी व्हॉट्सॲप किंवा फोनद्वारे माहिती देण्याचे आवाहन शहाजी उमाप यांनी केले आहे.

जुगार आणि दारू अड्ड्यांवर छापे

परिक्षेत्रात मटका आणि जुगार खेळणाऱ्या 41 जणांविरुद्ध 29 गुन्हे नोंदवून 6.15 लाखांचा माल जप्त केला. तसेच अवैध दारू विक्री करणाऱ्या 37 जणांवर 33 गुन्हे दाखल करण्यात आले असून, 8 लाखांची दारू जप्त केली. वाळू माफियांविरुद्धही दोन मोठे गुन्हे दाखल करून 23.29 लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT