Nanded Crime : कारवाईचा बडगा : नांदेड पोलिसांनी काढली जुगाऱ्यांची वरात (File Photo)
नांदेड

Nanded Crime : कारवाईचा बडगा : नांदेड पोलिसांनी काढली जुगाऱ्यांची वरात

जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड ग्रामीण पोलिसांनी जुगारविरोधी धडक मोहीम हाती घेतली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Nanded police arrest gamblers

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड ग्रामीण पोलिसांनी जुगारविरोधी धडक मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत लागोपाठ दोन ठिकाणी धाडी टाकून २२ जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवायांमध्ये रोख रकमेसह मोबाईल आणि वाहने असा एकूण पाच लाख ९२ हजार ९९० चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आरोपींना ताब्यात घेतले. बेकायदेशीर कृत्ये करणाऱ्यांना वचक बसवण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्थेचा धाक निर्माण करण्यासाठी पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांनी जुगार खेळणाऱ्यांची भररस्त्यातून वरात काढली. पोलिसांच्या या आक्रमक भूमिकेमुळे जुगार चालकांचे धाबे दणाणले असून नागरिकांमधून या कारवाईचे स्वागत होत आहे.

पहिली कारवाई २ सप्टेंबर रोजी हडको परिसरातील दादाराव जाधव यांच्या फार्म हाऊसजवळ करण्यात आली. तेथे तिर्रट नावाचा जुगार खेळणाऱ्या १५ जणांना रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईत काळबा गिरडे, राम मोरे, अरुण लोहकरे, हरिदास पुयड यांच्यासह इतर आरोपींकडून ₹२३,२९० रोख, १२ मोबाईल फोन आणि ५ मोटारसायकली असा एकूण ₹५,२६, २९० चा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर दुसरी कारवाई १ सप्टेंबर रोजी वाजेगाव येथील गुरुराज चांडोळकर यांच्या शेताजवळ करण्यात आली.

तेथे जुगार खेळणाऱ्या बालाजी सोनटक्के, सुभाष पवार, किशोर शिंदे यांच्यासह ७ जणांवर कारवाई करत ₹१,७०० रोख आणि एक मोटारसायकल (एमएच-२६, बीएम-२६५४) असा ६६, ७०० चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT