Nanded Phulwal Mahadev Temple
धोंडिबा बोरगावे
फुलवळ: कंधार तालुक्यातील मन्याड खो-याच्या शेजारी कंधार-उदगीर राष्ट्रीय महामार्गावर उंच टेकडीवर असलेल्या फुलवळ येथील महादेव मंदिरात आवण मास निमित्त दर्शनासाठी शिवभक्तांची मांदियाळी दिसून येत असून श्रावण महिष्यात दररोज आणि त्यातल्या त्यात दर सोमवारी या परिसरात भाविकांमुळे जत्रेचे स्वरूप येत असते. शेकडो वर्षांपूर्वीचा इतिहास असलेला येथील महादेव भक्तांच्या नवसाला पावणारा महादेव म्हणून सर्वदूर परिचित असलेल्या मंदिरात श्रवण मासनिमित्त भक्तांची अलोट गर्दी दिसून येत आहे.
हे मंदौर हेमाडपंथी असून जुने बांधकाम, दगडी पायल्या आहेत. जुनी महादेवाची पिंड आहे. जुने बांधकाम पाडून जवळपास पंधरा वर्षापुर्वी नवीन व्यांपकाम चालू होते, तेव्हा एक पटना महली. याच मंदिरात पकवणाचा नवीन नंदी बसवला आणि त्या ठिकाणचा जुना दगडाचा नंदी फुलवळ गावात मारुती मंदिराजवळ ठेवण्यात आला. परंतु तेव्हापासून गावामध्ये काही अनुचित प्रकार घडू लागले. तेल्हा हा जुना नंदी गावात आणल्यानेच असे घडते आहे, अशी भावना लोकांच्या मनात निर्माण झाली. तेव्हा सर्वांनी एकत्र येऊन पुन्हा त्या दगडी नंदीची त्याच मंदिरात पुनस्र्थापना बाजत गाजत केली. तेव्हापासून पकवानाचा नंदी व दगडाचा नंदी असे दोन्ही नंदी एकत्रच आहेत.
परराज्यातील भाविकांचीही दर्शनासाठी गर्दी वेळोवेळी या मंदीरात धार्मिक कार्यक्रम होतात. सन २००८ मध्ये ४१ दिवसाचे तपो अनुष्ठान सदुरु सोमलिग शिवाचार्य महाराज नीचकुंदेकर यांनी केले होते. त्यावेळी जवळपास एक होती. या उपक्रमाला महाराष्ट्रातूनच नव्हे तर कर्नाटक, आंध्र आणि परिसरातील भाविक लाख दीप प्रज्वलित करून रोषणाई केली भक्तांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. बारसनिमित्त भरते यात्रा दरवर्षी आमली बारस निमित्त फुलवळ येथे महादेवाची मोठी यात्रा भरते.
फुलवळसह पंचक्रोशीतील भाविक या यात्रेत सहभागी होतात. हे देवस्थान नवसाला पात्यणारे असल्याचे भाविक बोलुन दाखवतात, श्रावण महिण्यात महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश या भागातुन भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. परिसर झाला प्रकाशमय महादेव मंदिर परिसराच्या विकास कामासोबतच सध्या मूळ गाभावाचे नवीन बांधकाम प्रगतीपथावर आहे. यासाठी भाविकही स्वयंस्फूर्तीने देणगी देत असून शासकीय निधी उपलब्ध करून घेण्यासाठीही येथील मंडळी प्रयत्नशील आहेत.
आजपर्यंत येथे मंदिराच्या मूळ गाभाऱ्याचे हेमाडपंथी बांधकाम पूर्ण झाले असून लवकरच मंदिराच्या शिखराचे वांधकाम सुरुवात केले जाणार आहे. मंदिरापर्यंत पोहचण्यासाठी सिमेंट रस्त्याचे काम होऊन रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी विविध प्रकारचे वृक्षारोपण केले आहे. शिवाय सौर ऊर्जेचे सुमारे ४० पोल उभारून त्यावर विद्युत फोकस बसवल्याने परिसर प्रकाशमय झाला असून, सौंदर्यात नव्याने भर पडली आहे.
श्रवण महिन्यानिमित्त महादेव मंदीरात शिवलीलामृत ग्रंथ सामूहिक पारायण, शिवकथा व नामयज्ञ सप्ताह कीर्तन सोहळ्याचे आयोजन १९ ते १७ ऑगस्ट दरम्यान करण्यात आले आहे. भाविकांनी या सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन फुलवळवासिकार्यकडून करण्यात आले आहे.