illegal weapons seized Nanded pudhari photo
नांदेड

illegal weapons seized Nanded : सोशल मीडियावर शस्त्रासह फोटो टाकणे पडले महागात

तीन जण अटकेत, दोन खंजर जप्त

पुढारी वृत्तसेवा

नांदेड ः शहरात गुन्हेगारी वृत्तीला लगाम घालण्यासाठी नांदेड ग्रामीण पोलिसांनी ऑपरेशन क्रॅक डाऊन अंतर्गत धडक कारवाई सत्र सुरू केले आहे. रविवारी (दि. 10) पोलिसांनी विविध ठिकाणी सापळा रचून बेकायदेशीररीत्या शस्त्र बाळगणाऱ्या तीन इसमांना अटक केली. त्यांच्याकडून दोन धारदार लोखंडी खंजर जप्त करण्यात आले असून, याप्रकरणी तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही तरुण विनापरवाना शस्त्रे घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर व त्यांच्या पथकाने सूर्या गार्डन कमान आणि चंदासिंग कॉर्नर परिसरात सापळा लावला.

सोशल मीडियावरील स्टंटबाजी भोवली

या कारवाईत पोलिसांनी अमोल संजय वाघमारे (वय 21, रा. वडारगल्ली, इतवारा) आणि जसिंदरसिंग रामसिंग दुधानीया (वय 37, रा. चंदासिंग कॉर्नर) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे झडती घेतली असता, कमरेला लपवून ठेवलेले धारदार खंजर मिळून आले. तिसरा आरोपी शेख आयान ऊर्फ आयान मार्क (रा. देगलूर नाका) याने स्वतःकडील शस्त्राचा फोटो काढून या इंस्टाग्राम अकाउंटवर अपलोड केला होता. सोशल मीडियावरील या स्टंटबाजीची दखल घेत पोलिसांनी त्यालाही बेड्या ठोकल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT