Nanded News : मनपाने अतिक्रमण हटाव मोहीम गुंडाळली! File Photo
नांदेड

Nanded News : मनपाने अतिक्रमण हटाव मोहीम गुंडाळली!

कारवाई थांबविण्यासाठी कोणाचा दबाव होता ?

पुढारी वृत्तसेवा

Nanded News: Municipal Corporation wraps up encroachment removal campaign!

नांदेड, पुढारी वृत्तसेवा नांदेड वाघाळा महापालिकेच्या वतीने दोन-तीन दिवसांपूर्वी शहरातील देगलूरनाका भागात अतिक्रमण हटाब मोहीम राबविण्यात आली. परंतु, त्यानंतर मनपाची ही मोहीम गुंडाळण्यात आली. वास्तविक आणखी काही दिवस ही मोहीम सुरु राहणे आवश्यक होते, परंतु एका दिवसातच ही मोहीम गुंडाळल्या गेली. यासाठी मनपा प्रशासनाचर कोणाचा दबाव होता किंवा काय, असे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

वाहतुकीला अडथळा ठरत असलेली अतिक्रमणे शहराच्या इतर भागातही मोठ्या प्रमाणावर आहेत, त्यामुळे मनपाने देगलूर नाका भागप्रमाणेच इतर भागातही अतिक्रमण हटाव मोहीम राबविणे आवश्यक आहे. देगलूर नाका भागात वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे.

शहराबाहेर जाणारी वाहने देखील येथे वाहतूक कोंडीमुळे अनेक वेळा अडकून पडतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा ठरणारी ५० अतिक्रमणे मनपाने नुकतीच हटकली. अतिक्रमणे करून रस्त्यात अडथळा निर्माण करणाऱ्या व्यावसायिकांख्या नांदेड अतिक्रमणांवर मनपाने बुलडोझर चालविला. परंतु या भागातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी अतिक्रमण हटाव मोहीम आणखी काही दिवस सुरु ठेवणे गरजेचे होते.

प्रत्यक्षात एका दिवसाच्या कारवाईनंतर मनपाने ही मोहीम गुंडाळली. याचाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. चास्तविक शहाच्या अन्य भागातही अतिक्रमण हटाव मोहीम राबविणे गरजेचे आहे. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न काही प्रमाणात का होईना सुटू शकतो. शहरातील मुख्य रत्यांवर अतिक्रमणांचा विषय चर्चेला येत असताना महापालिकेसह पोलीस प्रशासन फक्त थातूरमातूर कारवाई करून सर्रासपणे सध्याची भूमिका घेत असल्याचे चित्र आहे.

हातगाड्यांनी व्यापली जागा

शहरातील वाहतूक समस्येला अतिक्रमणे हे एक प्रमुख कारण आहे. वाहनांची वाढती संख्या, अरुंद रस्ते, बेशिस्त वाहन चालक तसेच रस्त्याच्या दुतर्फा असलेली अतिक्रमणे, वामुळे वाहनधारकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. जुना मोंढा टॉवर, कलामंदिर, फुले मार्केट, शिवाजीनगर या भागात मुख्य रस्त्यालगतच हॉकर्स, फळ विक्रेते, हातगाडे, छोटे व्यावसायिक यांनी ताबा घेतल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT