Nanded Crime News : नायगाव तहसीलसमोर विषाची बाटली घेऊन वाळूच्या हायवा मालकाचा राडा !  File Photo
नांदेड

Nanded Crime News : नायगाव तहसीलसमोर विषाची बाटली घेऊन वाळूच्या हायवा मालकाचा राडा !

या प्रकाराने नायगाव तालुक्यात खळबळ उडाली.

पुढारी वृत्तसेवा

Nanded News : Illegal sand supply Hyva tipper owner Attempt to end life

बाळासाहेब पांडे

नायगाव, पुढारी वृत्तसेवा : तहसील कार्यालयासमोर शनिवारी दुपारी नाट्यमय घटना घडली. अवैध वाळू पुरवठा करणाऱ्या परमेश्वर हंबर्डे या हायवाटिपर मालकाने तहसीलदार व दलालांकडून हप्त्याच्या नावाखाली घेतलेले दीड लाख रुपये असूनही गाडी सोडण्यात आली नाही, असा आरोप करत तहसील कार्यालयासमोर विषाची बाटली घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न शनिवारी दुपारी केला. या प्रकाराने नायगाव तालुक्यात खळबळ उडाली.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर काही क्षणातच व्हायरल झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. नायगाव पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि नायब तहसीलदार विजय येरवाड यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मध्यस्थी केल्याने प्रसंग मोठा अनर्थ टळला.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित हायवा मालकाकडून नायगाव तहसील कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांनी आणि बिलोली तहसील कार्यालयात कार्यरत असलेले पण नायगाव तहसील परिसरातील वाळू व्यवहारात दलाली करणारे कारकून शेख युनूस यांनी हप्त्याच्या स्वरूपात मोठी रक्कम घेतली होती. त्यानंतर तडजोडीचे दीड लाख रुपये देऊनही संबंधित वाहन सोडण्यात आले नसल्याने संतप्त मालकाने कार्यालयासमोर आत्महत्येचा इशारा देत राडा घातला.

घटनेदरम्यान कार्यालयाबाहेर मोठी गर्दी जमली होती. काही लोकांनी त्याचे व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रीत करून सोशल मीडियावर पोस्ट केले, जे काही तासांतच वायरल झाले. हे कळताच सामाजिक कार्यकर्त्या सोनालीताई हंबर्डे यांनी धाव घेऊन या प्रकरणात हायवा मालकाचे मत परिवर्तन केले.

या प्रकरणानंतर तहसीलदार कार्यालयातील दलालीचा कारभार उघड झाल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. या घटनेतील व्हिडिओच्या आधारे तहसीलदार, संबंधित बिलोली तहसीलचा कारकून शेख युनूस, काही तलाठी हसनपल्ले, कदम, बावळे, आदी आणि इतर कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार की तडजोड करून वाहन सोडून देणार, याबाबत नायगाव परिसरात जोरदार चर्चा रंगली आहे. सामाजिक कार्यकर्त्या सोनालीताई हंबर्डे व स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे अवैध वाळू व्यवसायातील हप्तेखोरी व दलालीचा सखोल तपास करून यामध्ये असलेल्या दोषी अधिकारी व कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या विषयी अधिकची माहिती घेतली असता दोन वाळूने भरलेल्या हायवा कुंटूर पोलिस ठाण्यात लावल्या असून गुन्हा दाखल करण्याचा प्रकार चालू असल्याचे कुंटूर पोलिस ठाण्याचे सपोनी विशाल भोसले यांनी भ्रमणध्वनीवरून सांगितले अधिकची माहिती गुन्हा दाखल झाल्यानंतर देतो असे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT