Crime News pudhari photo
नांदेड

Nanded Crime News : मनोरंजनाच्या नावाखाली चालत होता जुगार; पोलिसांच्या छाप्यात फुटले बिंग

विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कामठा शिवारात मनोरंजन केंद्राच्या नावाखाली चालणाऱ्या एका हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला.

पुढारी वृत्तसेवा

Nanded News : Gambling operating under the guise of entertainment; police raid exposes the racket

नांदेड, पुढारी वृत्तसेवा विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कामठा शिवारात मनोरंजन केंद्राच्या नावाखाली चालणाऱ्या एका हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर पोलिसांनी रविवारी (१४ जून) पहाटेच्या सुमारास छापा टाकला. या धडक कारवाईत पोलिसांनी २८ आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून कार, मोटारसायकली, मोबाईल आणि जुगाराचे साहित्य असा एकूण १८ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गाडेगाव रोडवरील कामठा शिवार परिसरात जगनलाल यादव यांच्या जागेत काही इसम शासन प्राधिकृत मनोरंजन केंद्राचा परवाना असल्याचे भासवत होते. मात्र, प्रत्यक्षात तिथे मनोरंजनाचे खेळ न चालवता पैशांवर 'पपलू' नावाचा पत्त्यांचा जुगार खेळला आणि खेळवला जात होता. याची गुप्त माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वेंजने आणि विमानतळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामदास शेंडगे यांना मिळाली.

माहिती मिळताच पोलिसांच्या संयुक्त पथकाने १४ जून रोजी पहाटे ४:३८ वाजताच्या सुमारास या जागेवर अचानक छापा टाकला. पोलिसांची धाड पडताच जुगार अड्ड्यावर एकच खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळावरून २८ आरोपींना ताब्यात घेतले. या कारवाईत जुगाराच्या साहित्यासह ३२० प्लास्टिक कॉईन्स, २० मोबाईल फोन, ८ मोटारसायकली आणि २ कार असा एकूण १८,७१,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आरोपी शुभम संजयसिंह ठाकूर (गाडीपुरा, नांदेड), बिजयसिंह करणसिंह ठाकूर (गाडीपुरा, नांदेड), सत्यनारायण विजयसिंह बैस (गाडीपुरा, नांदेड), सोमेश्वर कोंडिबा आचमारे (शिवनगर, नांदेड), प्रकाश जळवाजी जमदाडे (सिद्धार्थ नगर, पूर्णा), शेख शफी शेख मोईन (उमर कॉलनी, देगलूर नाका), सोनू संजयसिंह ठाकूर (गाडीपुरा), कुंदन प्रकाश सूर्यतळ (आंबेडकर नगर), राजूसिंह ग्यानसिंह ठाकूर (गाडीपुरा), मोहम्मद गौस मोहम्मद आसीफ (मोहम्मदिया कॉलनी), विक्रमसिंह तारासिंह परमार (गाडीपुरा), अदनान अली नासेर अली (पिरबुऱ्हाण, नांदेड) यांच्यासह इतर १६ आरोपींना अटक करून विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि लोखंडे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT