Stormy Winds Solar Plant Damage Naigaon  Pudhari
नांदेड

Nanded News | नायगाव तालुक्यात वादळी वाऱ्याच्या तडाख्यात सोलर प्रकल्पाचे मोठे नुकसान

Naigaon Stormy Winds | जोरदार वाऱ्यामुळे सोलर पॅनल्सचे मोठ्या प्रमाणात नुकसान

पुढारी वृत्तसेवा

Stormy Winds Solar Plant Damage Naigaon

नायगाव : तालुक्यातील मांजरम येथे वादळी वाऱ्याने जोरदार तडाखा देत सोलर प्रकल्पाचे मोठे नुकसान केल्याची घटना घडली. सुशिक्षित तरुण शेतकरी माधव पांडुरंग शिंदे यांच्या शेतात उभारण्यात आलेल्या स्पान सोलर कंपनीच्या प्रकल्पाला पहाटे १ ते २ वाजण्याच्या दरम्यान या वादळाचा फटका बसला.

अचानक आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे सोलर पॅनल्सचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक पॅनल्स वाकले, काही तुटले, तर काहींचे स्ट्रक्चर कोसळल्याने प्रकल्पाचे नुकसान अधिकच वाढले. सोलर प्रकल्पावर आधारित शेती करणाऱ्या शेतकऱ्यासाठी हा मोठा आर्थिक धक्का मानला जात आहे.

सकाळी परिसरातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली असता नुकसानाची तीव्रता स्पष्ट झाली. या घटनेमुळे शेतकरी वर्गात चिंता व्यक्त केली जात असून नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, अशी मागणी पुढे येत आहे.

प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून मदत जाहीर करावी, तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घ्यावा आणि शेतकरी माधव शिंदे यांना आपत्ती निवारण योजनेंतर्गत तातडीची मदत द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT