नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका / Nanded Waghala City Municipal Corporation Pudhari News Network
नांदेड

Nanded Municipal Election : वरिष्ठांचा आदेश धुडकावला : आ. कल्याणकरांना खा. शिंदेंनी सुनावले !

नांदेड महानगरपालिका निवडणुकीसाठी नांदेड उत्तरमधील प्रभाग ३ मध्ये इच्छुक असलेल्या महिला उमेदवाराला बीफॉर्म न दिल्याचे प्रकरण आ. बालाजी कल्याणकर यांच्यावर शेकण्याची दाट शक्यता असून खा. बीकांत शिंदे यांनी हा प्रकार गांभीर्याने घेतल्याची माहिती आहे.

पुढारी वृत्तसेवा

Nanded Municipal Election News

नांदेड, पुढारी वृत्तसेवा नांदेड महानगरपालिका निवडणुकीसाठी नांदेड उत्तरमधील प्रभाग ३ मध्ये इच्छुक असलेल्या महिला उमेदवाराला बीफॉर्म न दिल्याचे प्रकरण आ. बालाजी कल्याणकर यांच्यावर शेकण्याची दाट शक्यता असून खा. बीकांत शिंदे यांनी हा प्रकार गांभीर्याने घेतल्याची माहिती आहे. दरम्यान मीनल पाटील यांनी या प्रभागात बंडाचा झेंडा उभारला आहे. त्यांनी दाखल केलेला उमेदवारी अर्ज कायम ठेवला असून त्यास पक्षश्रेष्ठींची अनुमती असल्याचे मानले जात आहे.

खा. श्रीकांत शिंदे यांच्या विश्वासू मानल्या जाणाऱ्या प्रभाग ३ मधून मीनल पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पक्षश्रेष्ठीनी त्यांचा बीफॉर्म आ. कल्याणकर यांच्याकडे दिला आणि तो दाखल करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या, अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बीफॉर्म जोडणे आवश्यक होते. परंतु आ. बालाजी कल्याणकर यांनी मीनल पाटील यांना चीफॉर्म दिलाच नाही. बीफॉर्म न मिळाल्याने संतापलेल्या मीनल पाटील यांनी समाजमाध्यमातून आ. कल्याणकर यांच्यावर टिकेची झोड उठक्त अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवण्याची तयारीही दर्शविली होती.

आ. कल्याणकर यांनी मीनल पाटील यांना डावलून करुणा कोकाटे यांना बीफॉर्म दिल्याची बाब पाटील यांनी खा. श्रीकांत शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिली. वावरून शिंदे यांनी कल्याणकर यांना चांगलेच धारेवर भरत कडक शब्दात कानउघाडणी केल्याचीही माहिती आहे. मीनल पाटील यांचे सांगवी परिसरातील वेगाने सुरू असलेले काम, त्यांचे पती गजानन पाटील पांचा खा. श्रीकांत शिंदे यांच्याशी असलेला निकटचा संबंध लक्षात घेता भविष्यात त्या कल्याणकर यांच्यासाठी अडचणीच्या ठरू शकतात, त्यामुळेच कल्याणकर यांनी मीनल पाटील यांचा पत्ता कट केला असावा, अशीही जोरदार चर्चा सुरू आहे.

आदेशाची पायमल्ली

काही दिवसांपवींच मीनल पाटील यांच्या कार्यालयाच्या उ‌द्घाटनासाठी खा. श्रीकांत शिंदे सांगवी येथे आले होते. त्याचवेळी पाटील यांची उमेदवारी निश्चित झाली होती. पाटील यांनीही जोमाने कामाला सुरुवात केली. शिंदे यांचा आदेश असतानाही कल्याणकर यांनी आदेशाची पायमल्ली केल्याचे आता उघड झाले आहे.

माझा अर्ज कायम-मीनल पाटील

माझ्या प्रभागातील मतदारांशी व कार्यकर्त्यांशी चर्चा करून मी दाखल केलेला अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. मी सुरू केलेल्या कामाला अधिक गती देणार आहे. मतदार माझ्या कामाची पावती नक्कीच देतील असा विश्वास मीनल पाटील यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT