Nanded municipal corporation pudhari photo
नांदेड

Nanded Municipal Corporation : ३८२९ मालमत्ताधारकांना मनपाच्या नोटिसा थकबाकी न भरल्यास होणार जप्तीची कार्यवाही

एकुण थकित कर आकारणीवरील शास्तीवर ८० टक्के सुट दिली जाणार

पुढारी वृत्तसेवा

नांदेड : नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत सुमारे ३ हजार ८२९ थकबाकीदार मालमत्ता धारकांना नोटिसा बजावल्या आहेत. एकुण थकित कर आकारणीवरील शास्तीवर ८० टक्के सुट दिली जाणार असून मालमत्ताधारकांनी तत्काळ कर भरणा करावा अन्यथा जप्तीची कार्यवाही केली जाणार असल्याचा इशाराही मनपा प्रशासनाने दिला आहे.

नांदेड वाघाळा शहर मनपाच्या वतीने थकबाकी मालमत्ताधारक यांच्यासाठी एक दिवसीय जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड, जिल्हा न्यायालय नांदेड यांच्या वतीने १२ सप्टेंबर रोजी नांदेड मनपा मुख्यालयात राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आली आहे. थकबाकीदार मालमत्ता धारकांना शास्तीवर 80टक्के सुट देण्यात येणार असून जे थकबाकीदार मालमत्ता कर भरणार नाहीत त्यांच्यावर जप्तीची कार्यवाही करण्यात येणार आहे. यासाठी मालमत्ताधारकांनी जप्ती कार्यवाही टाळण्यासाठी मालमत्ता कर भरून सहकार्य करण्याचे आवाहन सिडको क्षेत्रीय कार्यालय सहाय्यक आयुक्त डॉ. मिर्झा बेग यांनी केले आहे.

सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत जवळपास ३८२९ थकबाकीदार मालमत्ता धारकांना मनपा आयुक्त डॉ.महेश कुमार डोईफोडे यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त अजितपाल संधु, सहाय्यक आयुक्त डॉ. मिर्झा बेग यांच्या अधिपत्याखाली कार्यालय अधीक्षक विलास गजभारे, वरीष्ठ लिपीक, मिना अडबलवार, मोहन लांडगे,कर निरीक्षक संजय नागापूरकर, वसंत कल्याणकर, नारायण आठवले, मारोती सारंग, लिपीक सादुला खॉन, मालु एनफळे, प्रकाश दर्शने, रमेश यशवंतकर, ऊतम जोंधळे, राहुल पाईकराव, दीपक जोंधळे, रवींद्र पोवळे यांच्यासह लिपीक यांनी नोटिसा बजाल्या आहेत.

१२ सप्टेंबर रोजी नांदेड मनपा मुख्यालयात राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आली आहे. या लोक अदालतीत थकबाकीदार मालमत्ताधारकांनी कर भरणा करावयाचा असून त्यासाठी शास्तीवर विशेष सवलत दिली जाणार आहे. मालमत्ताधारकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मनपाच्यावतीने करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT