अनधिकृत बांधकामाविषयीची नोटीस बजाहूनही कोनाळे क्लासेसच्या संचालकांनी कुठलेही पाडकाम केले नाही Pudhari News network
नांदेड

Nanded Municipal Corporation : मनपाने नोटीस बजावूनही अनधिकृत बांधकाम जैसे थे..!

कोनाळे कोचिंग क्लासेसच्या संचालकानी नोटिसीला दाखवली केराची टोपली

पुढारी वृत्तसेवा

नांदेड : गुरुगोविंदसिंग स्टेडियमसमोरील कोनाळे कोचिंग क्लासेसच्या चार मजली इमारतीच्यावर बांधण्यात आलेल्या अनधिकृत टीनशेडचे बांधकाम २४ तासांच्या आत स्वतःहून हटवावे, अन्यथा मनपाच्या वतीने हे अनधिकृत टिनशेड पाडण्यात येईल, अशी नोटीस २३ सप्टेंबर रोजी मनपा प्रशासना मार्फत उपआयुक्त चावरे यांनी बजावली होती.

परंतु या अनधिकृत बांधकामाविषयीची नोटीस बजाहूनही आता १० दिवसांहून जास्त काळ उलटून गेला. अद्याप कोनाळे क्लासेसच्या संचालकांनी कुठलेही पाडकाम केले नसल्याचे समोर आले आहे. या वरून महापालिकेच्या नोटिसीला संचालकांनी केराची टोपली दाखवल्याची चर्चा रंगली आहे. या विषयी अधिक माहिती घेतली असता, या वर्षी कोनाळे क्लासेसच्या विद्यार्थ्यांच्या शिकवणी वर्गाला जागा अपुरी पडत असल्यामुळे कोनाळे क्लासेसच्या संचालकांनी कलासेसच्या गच्चीवर मनपाची कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता तेथे टिनशेड उभे केले आणि त्या ठिकाणी शिकवणी वर्ग सुरू केले

या अनधिकृत टिनशेड मध्ये विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची सोयीसुविधा न पुरविता सकाळ पासून ते संध्याकाळ पर्यंत शिकवणीवर्ग चालविल्या जात होते. चौथ्या मजल्यावर उभारलेल्या या टिनशेडपर्यंत पोहचण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता, दररोज १२५ ते १५० पायऱ्या चढाव्या आणि उतराव्या लागे, त्यामुळे त्याची प्रचंड दमछाक होत होती, त्याचा परिणाम त्याच्या अभ्यासावर होत होता, या विषयी पालकांमध्ये प्रचंड नाराजी होती, या अनधिकृत बांधकामाच्या विरोधात तक्रार आल्यानंतर सहायक आयुक्त चवरे यांनी २४ तासाच्या आत हे अनधिकृत बांधकाम स्वतः हून काढून घ्यावे, अन्यथा कार्यवाही करण्यात येईल असे नोटिसीद्वारे कलासेसचे संचालक व्यंकट कोनाळे यांना पाठवलेल्या नोटीसमध्ये बजावले होते. परंतु कोनाळे क्लासेसच्या संचालकांनी हे अनधिकृत टिनशेड 'जैसे से थे' ठेवत मुजोरी दाखवली आहे.

मागील महिन्याभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे अतिवृष्टी झाल्याने मनपा प्रशासनाची संपूर्ण यंत्रणा जनजीवन सुरळीत करण्याच्या कामात व्यस्त आहोत, असे उपयुक्त चवरे यांनी सांगितले आहे, अतिवृष्टी आणि जनजीवन सुरळीत झाले की, आम्ही या विषयी कारवाई करणार आहोत.
मनपा प्रशासन, नांदेड

परवानगी 'प्रिंटिंग प्रेस'साठी, वापर 'कोचिंग क्लासेस'साठी!

काही दिवसांपूर्वी कोनाळे कलासेसचे संचालक व्यंकट कोनाळे यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून औद्योगिक वसाहतीतील प्लॉट क्र. २५, ३६ सी खरेदी करून प्रिंटिंग प्रेस उभारण्यासाठी मनपा कडून बांधकाम परवाना घेतला होता. मात्र प्रत्यक्षात बहुमजली इमारत उभारून त्याठिकानी औद्योगिक वसाहतीचे स्वरूप बदलून शिकवणीसाठी भव्य टोलेजंग चार मजली इमारत उभारत या जागेचा वापर कोचिंग क्लाससाठी केला. ही बाब सामाजिक कार्यकर्ते दीपक कसबे यांनी शासनाच्या परिपत्रकाचा दाखला देत पुढे आणत या अनधिकृत बांधकामाच्या विरोधात तक्रार केली. त्याच्या तक्रारीची दखल घेत मनपा प्रशासनाने या कार्यवाहीचा बडगा उभारला आहे. परन्तु क्लासेस या नोटिसीला कचऱ्याची टोपली दाखवत कुठलेही पाडकाम न केल्यामुळे संचालकांच्या मुजोरीची चर्चा रंगली आहे. अनधिकृत बांधकामाच्या विषयावर मनपा प्रशासनने ठाम राहून हे टोलेजंग इमारतीचे बांधकाम लवकरात लवकर पाडावे आणि या विषयांत जिल्ह्याधिकारी यांनी वैयक्तिक लक्ष घालावे अशी मागणी तक्रारकर्ते यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT