Nanded Mumbai Flight 
नांदेड

Nanded Mumbai Flight | नांदेड-मुंबई विमानसेवा लवकरच

नांदेड-मुंबई विमानसेवा लवकरच

पुढारी वृत्तसेवा

नांदेड -

नांदेड-मुंबई नियमित विमानसेवा लवकरच सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेड जिल्ह्यातील आमदारांच्या शिष्टमंडळाला दिली. या निर्णयामुळे नांदेडसह मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

आमदार हेमंत पाटील, राष्ट्रवादीचे नेते आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार तुषार राठोड, आमदार राजेश पवार, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार भीमराव केराम, आमदार जितेश अंतापूरकर, आमदार आनंदराव बोढारकर आणि आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन विमानसेवा तातडीने सुरू करण्याची मागणी केली. सध्या नांदेड विमानतळ सर्व सुविधांनी सुसज्ज असले तरी मुंबई विमानतळावर स्लॉट उपलब्ध नसल्यामुळे ही सेवा बंद आहे.

शिष्टमंडळाला आश्वासन

मुंबई येथे नव्या विमानतळाचे काम सुरू असल्याने भविष्यात स्लॉट उपलब्ध होऊन नांदेड-मुंबई विमानसेवा नियमित सुरू होण्याचा मार्ग मोकळा होईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. दररोज सकाळी नांदेडहून मुंबईकडे आणि रात्री मुंबईहून नांदेडकडे विमानसेवा सुरू झाल्यास उद्योग, व्यापार, पर्यटन आणि व्यावसायिक क्षेत्राला मोठी चालना मिळेल. तसेच नांदेड, लातूर, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांनाही या सेवेचा लाभ होणार असल्याचे शिष्टमंडळाने सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT