death  Pudhari
नांदेड

Nanded News | अत्याचाराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन जीवन संपविले

मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

Mukhed Woman Ends Life Harassment

मुखेड: अत्याचाराच्या त्रासाला कंटाळून 40 वषिॅय विवाहिताने आपल्या रहात्या घरी गळफास घेऊन जीवन संपविले. ही घटना मुखेड तालुक्यातील लादगा या गावी घङली.

या बाबत सविस्तर वृत असे की, मृत महिला सविता बालाजी केंद्रे (वय 40 रा.लादगा) ही वाटेक-याच्या शेतात काम करीत असताना तहान लागल्याने आरोपी रामेश्वर शिवाजी कोंडलवाडे याच्या शेतात पिण्याचे पाणी आणण्यासाठी गेली होती. यावेळी अरोपी रामेश्वर याने जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केला. त्यावेळी तिने कोणाला काही सांगितले नाही, कामावरुन घरी आल्यानंतर आरोपी रामेश्वर याच्या अत्याचाराच्या त्रासाला कंटाळून नवरा, मुलांना सोडून जात आहे, अशी चिठ्ठी लिहून गळफास घेऊन जीवन संपविले.

मृत महिलेचा पती बालाजी पुंडलीक केंद्रे (वय 46, रा. लादगा) यांच्या फिर्यादी वरुन रामेश्वर कोंडलवाडे याच्या विरुध्द मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक लक्ष्मणराव केंद्रे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT