Crime News  Pudhari
नांदेड

Nanded Crime | वास्तुशांतीनंतर घरातील देव्हारा फेकल्यावरून वाद; विळ्याने गळा, डोके, मानेवर वार करून महिलेचा खून

मुखेड तालुक्यातील हसनाळ येथील घटनेने खळबळ

पुढारी वृत्तसेवा

Mukhed Woman Sickle Attack

मुखेड : नवीन घरातील देव्हारा बाहेर फेकून दिल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून वृद्ध महिलेचा खून झाल्याची घटना मुखेड तालुक्यातील हसनाळ (प.दे.) येथे मंगळवारी (दि. १७) घडली. या प्रकरणी मुखेड पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक चंदन गदगे यांच्या घरी वास्तुशांती कार्यक्रम झाल्यानंतर नवीन घरातील देव्हारा आरोपी मारुती भुजंग गायकवळे याने उचलून बाहेर फेकून दिला. यावर दीपक यांच्या आई लक्ष्मीबाई चंदर गदगे यांनी देव्हारा का फेकला, असा जाब विचारला. यावरून आरोपी आणि लक्ष्मीबाई यांच्यात वाद झाला.

वादातून संतप्त झालेल्या आरोपीने लक्ष्मीबाई यांच्यावर विळ्याने गळा, डोके आणि मानेवर वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या लक्ष्मीबाई यांचा मृत्यू झाला.

या घटनेप्रकरणी दीपक चंदन गदगे यांनी मुखेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून आरोपी मारुती भुजंग गायकवळे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक कामठेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश माने पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT