Mukhed Gram Panchayat Reservation Pudhari
नांदेड

Mukhed Sarpanch Reservation | मुखेड तालुक्यातील १३० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर

६६ ग्रामपंचायतींमध्ये महिलांना संधी; मागास प्रवर्गाच्या सहा जागा कमी, अनुसूचित जमातीच्या आरक्षणात एका जागेची वाढ

पुढारी वृत्तसेवा

Nanded Mukhed Gram Panchayat Reservation

मुखेड : मुखेड तालुक्यातील १३० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. तहसील कार्यालयात झालेल्या आरक्षण सोडत प्रक्रियेत विविध प्रवर्गांसाठी जागा निश्चित करण्यात आल्या. यावेळी यापूर्वी काढण्यात आलेल्या आरक्षणात किरकोळ बदल झाले असून, नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) यांच्या आरक्षणातील सहा जागा कमी झाल्या आहेत. तर अनुसूचित जमातीच्या आरक्षणात एका जागेची वाढ झाली आहे. नव्याने स्थापन झालेल्या रत्नातांडा ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव करण्यात आले आहे.

तालुक्यातील १३० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांपैकी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी २९ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यापैकी १५ जागा महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आठ ग्रामपंचायतींची सरपंचपदे राखीव असून, त्यातील चार जागा महिलांसाठी आहेत.

नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी २८ ग्रामपंचायतींची सरपंचपदे राखीव ठेवण्यात आली आहेत. यामध्ये १४ जागा महिलांसाठी राखीव आहेत. खुल्या प्रवर्गासाठी ६५ ग्रामपंचायतींची सरपंचपदे निश्चित करण्यात आली असून, त्यापैकी ३३ जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

या आरक्षणाच्या आकडेवारीनुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि खुला प्रवर्ग यामध्ये मिळून ६६ ग्रामपंचायतींची सरपंचपदे महिलांसाठी राखीव झाली आहेत. त्यामुळे आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत तालुक्यातील ६६ ग्रामपंचायतींमध्ये महिलांना सरपंचपदाची संधी मिळणार आहे.

सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीसाठी २२ सप्टेंबर रोजी तहसील कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. आरक्षण जाहीर होणार असल्याने ग्रामीण भागातून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरक्षण कोणत्या ग्रामपंचायतीसाठी कोणत्या प्रवर्गात पडणार, याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता होती.

आरक्षण सोडत बैठकीस नियंत्रण अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अनुप पाटील, प्राधिकृत अधिकारी तथा तहसीलदार अभयराज नंजुंडे उपस्थित होते. तसेच निवडणूक विभागातील अनुभवी कर्मचारी संदीप भुरे, सुनील कुलकर्णी, औदुंबर वाडीकर, गणेश बंडे आणि फरदीन शेख यांनी आरक्षण प्रक्रियेसाठी सहकार्य केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT