Malakoli Ahmadpur Highway Youth killed
माळाकोळी: माळाकोळी - अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावर लांडगेवाडीजवळ दुचाकीच्या धडकेत पादचारी तरुणचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि.२३) सायंकाळी घडली. राजू उत्तम जाधव ( वय 32, रा. खिरुतांडा, ता. लोहा) असे मृत तरुणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, माळाकोळी अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावर राजू जाधव शेतातून बैल घेऊन घरी जात होता. यावेळी पाठीमागून आलेल्या दुचाकीने (MH12MP2391) त्याला जोराची धडक दिली. यात तो गंभीर जखमी झाला. उपचारासाठी नांदेड येथे नेत असताना त्याचा रस्त्यातच मृत्यू झाला. दुचाकी वरील अन्य दोघे जण किरकोळ जखमी झाली आहेत.
लांडगेवाडी नजीक असलेला खिरु तांडा पार्टी येथे महामार्ग तयार झाल्यापासून आठ अपघात झाले आहेत. त्यात चार जण मृत्यूमुखी पडले असून अन्य काहीजण जखमी झाले आहेत. त्यामुळे हे ठिकाण मृत्यूचा सापळा बनला आहे.