Laborer Death AI File Photo
नांदेड

Laborer Death Nanded | साईटवर टिप्परने रात्री माती टाकली; जेसीबीने माती भरताना ऑपरेटरचे पाय दिसल्याने खळबळ

माहूर तालुक्यातील जुनापाणी परिसरात एका कन्स्ट्रक्शन साईटवर निष्काळजीपणामुळे एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे

पुढारी वृत्तसेवा

Mahur Taluka Junapani Laborer Buried Under Soil

वाई बाजार : जुनापाणी जवळील शारदा कन्स्ट्रक्शन कंपनीच्या साईटवर काम करणाऱ्या ऑपरेटरचा मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि.२) सकाळी साडेआठच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, झारखंड राज्यातील कोंडरमा जिल्ह्यातील जोंगी गावचा रहिवासी अजित यादव (वय ३५) हा संबंधित साईटवर ऑपरेटर म्हणून कार्यरत होता. साईटवर काम करणाऱ्या इतर मजुरांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील दहा दिवसांपासून कंपनीकडून वीजपुरवठ्यासाठी वापरण्यात येणारा जनरेटर बंद होता. त्यामुळे उष्णतेमुळे त्रस्त मजूर रात्री उघड्या जागेत झोपत होते.

१ मे रोजी रात्री सुमारे ९ वाजता अजित यादव मोकळ्या जागेत झोपला होता. त्याच वेळी, इतर ठिकाणाहून माती आणणाऱ्या टिप्परने नकळत त्याच जागी माती टाकली. अजित झोपलेल्या अवस्थेतच मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडला गेला. ही बाब रात्री कोणाच्याही लक्षात आली नाही.

दुसऱ्या दिवशी सकाळी जेसीबीच्या सहाय्याने माती दुसऱ्या टिप्परमध्ये भरताना अजितचे पाय दिसून आल्याने ही घटना उघडकीस आली. यानंतर माहूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला.

अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नसून अधिक तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT