BJP candidate joins NCP
लोहा : लोहा नगरपालिका निवडणुकीत मतदान सुरू असतानाच दुपारी एक वाजता भाजपचे उमेदवार प्रभाग क्रमांक दहा मधील संजय चव्हाण यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केल्याने शहरात त्याची जोरदारपणे चर्चा होत आहे.
लोहा नगरपालिका निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू असताना प्रभाग क्रमांक दहा भाजपाचे उमेदवार संजय चव्हाण यांनी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.याची शहरभर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
यावेळी माजी आमदार मोहन अण्णा हंबर्डे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शरद पवार हंसराज पाटील बोरगावकर यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.