Leopard pudhari
नांदेड

Nanded news | बिबट्याची दहशत ग्रामीन जनजीवन विस्कळीत

Leopard sightings Nanded| महावितरणच्या मनमानी कारभारामुळे रात्रीच्यावेळी विद्युत पुरवठा असल्यामुळे शेतक-यांना जिवावर उदार होऊन शेतात जावं लागतंय

पुढारी वृत्तसेवा

मुखेड: तालुक्यात कुठे ना कुठे बिबट्या आल्याच्या बातम्यामुळे ग्रामीण भागातील विशेषतः शेतक-याचे जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसुन येते. तालुक्यातील सलगरा बु. येथील तलावाच्या बाजुला बिबट्या आला होता, त्यानंतर दि. 13 रोजी संध्याकाळी सलगरा खु. येथील बंडावार यांचे शेतात दोन बिबटे येत असल्याचे पाहुन जवळच्या शेतात पाणी देणा-या दोन शेतक-यानी पाहीले व शेताला पाणी देणं सोडुन गावाकडे धुम ठोकली.

अतिवृष्टीमुळे खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर शेतक-यानी कंबर कसली व रब्बी पेरण्या उरकुन घेतल्या. सध्या पिके चांगली असल्यामुळे त्याना वेळेवर पाणी देण्यासाठी शेतकरी जिव मुठीत ठेवुन शेतात जात आहेत. पण वेळी अवेळीच्या बिबट्याच्या अगमनामुळे शेतकरी मात्र हतबल झाला आहे. बिबट्याच्या भितीने पिकाला पाणी न मिळाल्यास रब्बी पिक हातची जिण्याची भिती आहे. पण महावितरणच्या मनमानी कारभारामुळे रात्रीच्यावेळी विद्युत पुरवठा असल्यामुळे शेतक-यांना जिवावर उदार होऊन शेतात जात आहेत.

शेतक-याच्या अवस्था लक्षात घेता महावितरणने दिवसा विद्युत पुरवठा करावा अशी मागणी सलगरा खु. चे माजी सरपंच अविनाश देशमुख यांनी केली आहे. ह्या भागातील बिबट्याचा वावर लक्षात घेता स्थानीक वन विभागाने ह्या भागात प्रभावी शोध मोहीम घेवुन बिबट्याला जेरबंद करुन ग्रामीण भागातील जनतेला दिलासा देण्याची ही मागणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT