Crime News  pudhari
नांदेड

Nanded Crime : खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला नांदेड एलसीबीने ठोकल्या बेड्या!

लातूर जिल्ह्यातील खून प्रकरण, आसना पुलाजवळून घेतले ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

नांदेड : लातूर जिल्ह्यातील जळकोट पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका खळबळजनक खुनाच्या गुन्ह्यातील आणि न्यायालयातून अजामीनपात्र वॉरंट जारी असलेला मुख्य आरोपी गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता. नांदेड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत शिताफीने कारवाई करत या आरोपीला येथील आसना पुलाखाली सापळा रचून ताब्यात घेतले. रवि रमेश हाडसे (वय 34 वर्ष, रा. त्रिरत्न नगर, सांगवी, नांदेड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळकोट (जि. लातूर) पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या सेशन केस क्रमांक 30/2017 मधील भादंवि कलम 302 (खून), 201 (पुरावा नष्ट करणे), 120 (ब) (गुन्हेगारी कट रचणे), 341, 363, 34 अंतर्गत दाखल गुन्ह्यात अतिरिक्त सत्र न्यायालय उदगीर यांनी आरोपीविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट बजावले होते. तेव्हापासून आरोपी गुंगारा देत होता.

दिनांक 22 मे रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मिलिंद सोनकांबळे यांना सदर आरोपी नांदेड येथील आसना ब्रिजच्या परिसरात दबा धरून बसल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत सापळा लावला आणि आरोपी रवि हाडसे याला ताब्यात घेतले. पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपीला जळकोट (जि. लातूर) पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

ही धडक कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अतुल भोसले, पोउपनि मिलिंद सोनकांबळे, पोलीस अंमलदार रविशंकर बामणे, चंद्रकांत स्वामी, अनिल बिरादार आणि अझरोद्दीन शेख यांच्या पथकाने केली.

अशी झाली कारवाई...

नांदेड जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत पाहिजे असलेल्या आणि फरार आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अतुल भोसले यांनी सहायक पथकाला गोपनीय माहिती काढून कारवाईचे आदेश दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT